CoronaVirus Live Updates : अरे देवा! कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांनी चक्क रुग्णालयातून चोरले ऑक्सिजन सिलिंडर; घटनेने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 11:45 AM2021-04-21T11:45:41+5:302021-04-21T11:52:36+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates : ऑक्सिजन नसेल तर उपचार कसे होणार? असा सवाल करत ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची मागणी डॉक्टर प्रशासनाकडे करीत आहेत. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
नवी दिल्ली - भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 1,56,16,130 वर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. याच दरम्यान अनेक रुग्णालयाकडे असलेला ऑक्सिजनचा साठा संपत आला आहे. रुग्णालयातील डॉक्टर हतबल झाले असून डॉक्टरांनी रुग्णांच्या नातेवाईकांना या परिस्थितीची स्पष्ट कल्पना देण्यास सुरुवात केली आहे. ऑक्सिजन नसेल तर उपचार कसे होणार? असा सवाल करत ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची मागणी डॉक्टर प्रशासनाकडे करीत आहेत. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
कोरोनामुळ अनेक राज्यात भयंकर परिस्थिती निर्माण झाली असून रुग्णांच्या नातेवाईकांवर चक्क आता ऑक्सिजन सिलिंडर चोरण्याची वेळ आली आहे. मध्य प्रदेशच्या दमोहमध्ये ही घटना घडली आहे. नातेवाईक ऑक्सिजन सिलिंडर चोरून घेऊन जात असल्याचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. जिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री ऑक्सिजन सिलिंडरने भरलेली एक गाडी रुग्णालयाजवळ आली होती. त्याचवेळी रुग्णालयात उपचार सुरू असणाऱ्या कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांनी एक-एक करून सिलिंडर चोरून नेला.
CoronaVirus Mumbai Updates : नवा उच्चांक! गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ; चिंता वाढवणारी आकडेवारीhttps://t.co/jaVx6erImA#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindia
— Lokmat (@MiLOKMAT) April 21, 2021
डॉक्टर्स आणि रुग्णालय प्रशासनाने नातेवाईकांना थांबवण्याचा प्रय़त्न केला मात्र ते काहीही ऐकून घेण्यास तयार नव्हते. रुग्णालयात रुग्णांची परिस्थिती गंभीर असताना नातेवाईक मात्र सिलिंडर घेऊन पळ काढत होते. तसेच रुग्णांच्या नातेवाईकांनी मेडिकल स्टाफ, इतर कर्मचारी आणि डॉक्टर यांच्याबरोबर गैरवर्तन देखील केले. परिस्थितीची माहिती मिळाल्यानंतर रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन आणि सीएमएचओ घटनास्थळी दाखल झाले होते. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. तसेच अधिक तपास सुरू आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
CoronaVirus Mumbai Updates : परिस्थिती गंभीर! "असं मी याआधी कधीच पाहिली नाही... आम्ही खूप हतबल आहोत"; डॉक्टरही भावूकhttps://t.co/wYAtYF7h60#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindia#coronainmaharashtra#MaharashtraFightsCorona#Doctor
— Lokmat (@MiLOKMAT) April 21, 2021
मोठा दिलासा! दररोज 700 टन ऑक्सिजनचा पुरवठा करतेय Reliance; तब्बल 70 हजार रुग्णांचा वाचणार जीव
कोरोनाच्या संकटात रिलायन्सने मोठा दिलासा दिला आहे. देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असताना रिलायन्स राज्यांना दररोज तब्बल 700 टन ऑक्सिजनचा पुरवठा करत आहे. यामुळे 70 हजार रुग्णांचा जीव वाचणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडे (Reliance Industries) आपल्या जामनगर ऑईल रिफायनरीमध्ये दररोज 700 टनांहून अधिक मेडिकल-ग्रेड ऑक्सिजन (Medical Oxygen) तयार करत आहे. कोरोनाच्या संकटात काही राज्यांना हे ऑक्सिजन विनाशुल्क दिले जात आहे. कोरोनामुळे देशात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा वापर लक्षात घेता रिलायन्सने अधिक ऑक्सिजन तयार करण्याचा निर्णय घेतला. गुजरातमधील कंपनीच्या जामनगर रिफायनरीने सुरुवातीला 100 टन वैद्यकीय दर्जाच्या ऑक्सिजनचे उत्पादन केले, जे आता त्वरित 700 टन करण्यात आले. कोरोनाचा सामना करत असलेल्या गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश यांसारख्या राज्यात पुरविल्या जाणाऱ्या पुरवठ्यामुळे दररोज 70,000 हून अधिक गंभीर रुग्णांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. लवकरच कंपनीची वैद्यकीय ग्रेड ऑक्सिजन उत्पादन क्षमता वाढवून 1000 टन करण्याची योजना आहे.
CoronaVirus Live Updates : कोरोनाच्या संकटात आशेचा किरण! परिस्थिती गंभीर असलेल्या राज्यात रिलायन्सकडून मोफत पुरवला जातोय ऑक्सिजनhttps://t.co/vZWKZ6ykv0#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindia#RelianceIndustries#Oxygen
— Lokmat (@MiLOKMAT) April 21, 2021
CoronaVirus Live Updates : भय इथले संपत नाही! देशात तब्बल 12,71,00,000 हून अधिक जणांना दिली कोरोना लस https://t.co/8v5izu53mL#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindia#HarshVardhan
— Lokmat (@MiLOKMAT) April 21, 2021