नवी दिल्ली - कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असून सर्वांच्याच चिंतेत भर पडली आहे. जगभरात युद्धपातळीवर संशोधन सुरू आहे. संशोधनातून नवनवीन माहिती समोर येत आहे. संशोधनातून अधिक एक धक्कादायक माहिती आता पुन्हा एकदा समोर आली आहे. आळशी लोकांना कोरोनामुळे मृत्यू होण्याचा धोका जास्त असल्याचं आता समोर आलं आहे. एका रिसर्चमध्ये हा धडकी भरवणारा खुलासा करण्यात आला आहे.
व्यायाम आणि शारीरीक हालचाली कमी असणाऱ्या व्यक्तींमध्ये कोरोनाची लक्षणं तीव्र असून, अशा लोकांना कोरोनामुळे मृत्यू होण्याचा धोका जास्त असल्याची माहिती मिळत आहे. ब्रिटिश जर्नल ऑफ स्पोटर्स मेडिसीन या वैद्यकीय जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. या संशोधनानुसार, कोरोनाची साथ येण्याच्या दोन वर्ष आधापासून ज्या व्यक्तींना व्यायाम करणं सोडून दिलं. त्याचबरोबर त्यांच्या शारीरिक हालचाली कमी आहेत. त्यांना कोरोनानंतर रुग्णालयात दाखल करावं लागतं आहे.
शारीरिक हालचाल न करणाऱ्यांना कोरोनाचा संसर्गाचा आणि मृत्यूचा धोका
धक्कादायक म्हणजे आळशी व्यक्तींना लागण झाल्यास थेट आयसीयूमध्ये भरती करावं लागत असल्याचं नव्या संशोधनात दिसून आलं आहे. धुम्रपान, लठ्ठपणा किंवा उच्च रक्तदाब यांच्या तुलनेत शारीरिक हालचाल न करणाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा आणि मृत्यूचा धोका अधिक असल्याचं या अभ्यासात नमूद करण्यात आलं आहे. शारीरिक हालचाल न करणे, यामुळे कोरोना होण्याचा आणि मृत्यू ओढवण्याचा धोका जास्त असल्याचं अभ्यासकांनी म्हटलं आहे. अमेरिकेत 48 हजार 440 कोरोना रुग्णांवर संशोधन करण्यात आलं. जानेवारी आणि ऑक्टोबर 2020 मध्ये हा अभ्यास करण्यात आला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
कोरोनाच्या संकटात आता डबल मास्क करणार बचाव?; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला, रिसर्चमधून मोठा खुलासा
कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क लावण्याचा सल्ला दिला जातो. काही ठिकाणी मास्क न लावल्यास दंड देखील भरावा लागतो. याच दरम्यान कोरोनासारख्या व्हायरसपासून वाचण्यासाठी डबल मास्किंग म्हणजेच दोन मास्क लावा असा सल्ला आरोग्यविषयक तज्ज्ञांनी दिला आहे. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच दरम्यान डबल मास्क लावण्याचा अत्यंत महत्त्वाचा सल्ला दिला जात आहे. अनेक सेलिब्रिटी आणि अधिकारी आपल्या चेहऱ्यावर दोन मास्क लावताना दिसत आहेत. सेलिब्रिटींनी केलेला दोन मास्कचा वापर आणि तज्ज्ञांचा सल्ला बघता वैज्ञानिक दृष्टीकोनातून दोन मास्कचा वापर खरोखर योग्य आहे का हे जाणून घेणे महत्वाचं आहे.तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, चेहऱ्यावर दोन मास्क लावल्याने आपले व्हायरसपासून संरक्षण होऊ शकतं.