CoronaVirus Live Updates : मोठा हलगर्जीपणा! धावत्या वाहनातून रस्त्यावर पडला कोरोनाग्रस्ताचा मृतदेह अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2021 08:32 AM2021-04-24T08:32:25+5:302021-04-24T08:36:26+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनाच्या संकटात अनेक ठिकाणी प्रशासनाचा निष्काळजीपणा दिसून येत असतानच या घटनेने सर्वांना धक्का बसला आहे. 

CoronaVirus Live Updates vidisha negligence in carrying bodies of infected dead body fell on road in middle of running | CoronaVirus Live Updates : मोठा हलगर्जीपणा! धावत्या वाहनातून रस्त्यावर पडला कोरोनाग्रस्ताचा मृतदेह अन्...

CoronaVirus Live Updates : मोठा हलगर्जीपणा! धावत्या वाहनातून रस्त्यावर पडला कोरोनाग्रस्ताचा मृतदेह अन्...

Next

नवी दिल्ली - देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना अनेक धक्कादायक घटना सातत्याने समोर येत आहेत. कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून मृतांचा आकडा देखील वाढतच आहे. एकूण रुग्णसंख्या ही तब्बल दीड कोटीच्या वर गेली आहे. तर लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूनंतरही हाल होत असल्याच्या काही घटना याआधी समोर आल्या आहेत. अशीच एक धक्कादायक घटना आता पुन्हा एकदा मध्य प्रदेशमध्ये घडली आहे. कोरोना रुग्णाचे मृतदेह हाताळताना मोठा हलगर्जीपणा आता समोर आला आहे. कोरोनाच्या संकटात अनेक ठिकाणी प्रशासनाचा निष्काळजीपणा दिसून येत असतानच या घटनेने सर्वांना धक्का बसला आहे. 

कोरोना रुग्णाचा मृतदेह हा धावत्या वाहनातून रस्त्यावर पडल्याची भयंकर घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील विदिशा मेडिकल कॉलेजमधील हलगर्जीपणाची आणखी एक घटना समोर आली आहे. शव घेऊन जाणाऱ्या वाहनातून कोरोनाग्रस्ताचा मृतदेह हा भर रस्त्यात पडला. लोकांच्या हा प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी मोठमोठ्याने आवाज देऊन वाहन थांबवलं. त्यानंतर तो पुन्हा उचलून वाहनात ठेवण्यात आला आणि अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आला. या धक्कादायक घटनेचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. 

एका वाहनात एकावेळी फक्त दोन मृतदेह ठेवता येतात. पण या वाहनात तीन मृतदेह ठेवण्यात आले होते. हे मृतदेह स्ट्रेचरवर ठेवण्यात आले होते. धावत्या गाडीमुळे स्ट्रेचर वाहनाच्या दरवाजाला धडकले आणि दरवाजा उघडला गेला. त्यामुळे मृतदेह रस्त्यावर पडला. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. ही गाडी मध्य प्रदेश रक्त सहकार्य समितीची होती. हे विदिशा मेडिकल कॉलेजला लागून आहे आणि खूप जुने झाले आहे. काही जणांनी वाहनातून मृतदेह खाली पडल्याचे पाहिले. यानंतर त्यांनी जोरजोरात आवाज देऊन चालकाला थांबवले. यानंतर मृतदेह पुन्हा वाहनात ठेवण्यात आला.

विदिशातील अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेजमध्ये यापूर्वीही अशा प्रकारच्या हलगर्जीपणाच्या घटना घडल्या आहेत. 13 एप्रिलला एका कोरोना रुग्णाला दोन वेळा मृत घोषित करण्यात आले होते. नातेवाईकांना मृत्युचा दाखलाही दिला गेला. कुटुंबातील काही सदस्य अंत्यसंस्कारासाठी स्मशानात गेले. अंत्यसंस्काराची तयारी करू लागले. मृतदेह येण्याची ते वाट पाहत होते. त्याचवेळी फोन आला. रुग्ण जिंवत असल्याचं मेडिकल कॉलेजकडून सांगण्यात आलं. श्वास थांबल्याने ही समस्या निर्माण झाली होती अशी माहिती देण्यात आली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Read in English

Web Title: CoronaVirus Live Updates vidisha negligence in carrying bodies of infected dead body fell on road in middle of running

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.