कोरोनाचा प्रादुर्भाव हा गेल्या काही दिवसांपासून वेगाने वाढत आहे. अनेक उपाययोजना केल्यानंतरही कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झालेली नाही. परिणामी देशात लॉकडाउनच्या ६० दिवसानंतर काही ठिकाणी नियमांमध्ये सूट मिळाली आहे. ज्या ठिकाणी कोरोना रुग्णांच्या संख्येत घट आहे. अशा ठिकाणी जनजीवन थोड्या प्रमाणात सुरळीत होताना दिसत आहे. तर दुसरीकडे अजुनही हजारोंच्या संख्येत विविध शहरात मजूर अडकून पडले आहेत. त्यांना त्यांच्या घरी सुरक्षित पाठवण्यासाची जबादारी शासनाने घेतली असून, अनेकजण श्रमिक ट्रेनने आपापल्या घरी पोहचले आहे. दरम्यान अनेकजण जोखिम पत्करत पायीच पायपिट करत आपल्या घरी पोहचत आहेत. मात्र या प्रवासादरम्यान अनेकांनी कोरोनाची लागण झाल्याचीही प्रकरणे समोर आली आहेत. अशात श्रमिक ट्रेन सुरू झाल्यानंतर मजुरांसाठी दिलासादायक बातमी असली तरी काही ठिकाणी मात्र मजुरांचे हाल हे काही संपत नसल्याचे चित्र समोर येत आहे.
उत्तर प्रदेशला जाणाऱ्या श्रमिक ट्रेनमध्ये 10 महिन्याचे बाळ तापाने फणफणत होते. मात्र त्याच्यावर वेळीच उपचार न झाल्याने बाळाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या मुलाच्या कुटुंबीयांनी वेगवेगळ्या स्टेशनवर बाळासाठी डॉक्टरांची शोध घेतला. मात्र अशा कोणत्याही प्रकारची सुविधा अद्यापतरी करण्यात आलेली नाही. वेळीच वैद्यकीय सुविध उपलब्ध झाली असती तर आज बाळ जिंवत राहिले असते. मात्र वैद्यकीय सुविधा नसल्याने बाळाचा अंत झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
बाळाची तपासणी केल्यानंतर त्याला कोरोनाची लागण झाल्याचे धक्कादायक बाब समोर आली. कोरोनामुळे हा चिमुकला दगावला. सध्या कुटुंबीयांनाही क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.