लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात आजपासून अनेक ठिकाणी मद्यविक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. सकाळपासूनच वाईन शॉप सुरू होण्यापूर्वीच नागरिकांनी मोठ्या संख्येने लांब रांगा लावल्या होत्या. यावर अनेक बॉलिवूड कलाकारांनी फनी जोक्स सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सोशल मीडियावर लॉकडाऊनला घेवून अनेक मिम्स ट्रेंड होत असताना असतानाच अभिनेते आणि माजी खासदार परेश रावल यांच्या एका व्टीटनेदेखील धमाल उडवली आहे.
वाईन शॉप सुरू झाल्याने सर्वत्रच आनंदी आनंद आहे. त्यामुळे परेश रावल यांनी देखील ट्वीट करत जोक शेअर केला आहे. त्यांचे हे ट्वीट सध्या खूप व्हायरल होत आहे. त्यांनी म्हटले की, ''कृपया, पीने के बाद गाड़ी सीधे घर ले जाएं. कोई भी चीन से लड़ने नहीं जाएगा." बाबूभैयां अर्थात परेश रावल यांच्या या ट्टीटवर नेटीझन्सदेखील फनी रिप्लाय देत आहेत. परेश रावल यांच्या सेन्स ऑफ ह्युमरचे नेटीझन्स कौतुक करताना पाहायला मिळत आहे. सध्या अशाप्रकारचे अनेक फनी मिम्स सोशल मीडियावर ट्रेंडही होत आहेत.
वेळोवेळी परेश रावल सोशल मीडियावर विविध विषयांवर आपले विचार मांडताना दिसतात. तबलिगी जमातच्या 'त्या' सदस्यांना परेश रावल यांचा एकच टोकदार सवाल केला होता. लॉकडाऊन वाढविण्याचे समर्थन करताना परेश रावल म्हणाले, 'नोव्हेल कोरोना व्हायरसच्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये ज्या पद्धतीने वाढ होत आहे, ते पाहता, ही काळाची गरज आहे आणि हे सर्वांच्याच हिताचे आहे.' यावेळी लॉकडाऊनचे उल्लंघण करणाऱ्यांसोबत पोलीस कठोरपणे वागत असल्याच्या तक्रारींसदर्भात ते म्हणाले, 'पोलिसांनाही हे बरे वाटत नाही. मात्र, लोक परिस्थितीचे गांभीर्यच ओळखायला तयार नसतील, तर त्यांच्यावर कठोर कारवाई करावीच लागेल.'