नवी दिल्ली - लॉकडाउनमुळे चिंतेत असलेल्या एमएसएमई (सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग) क्षेत्राला लोन रिस्ट्रक्चरिंग, क्रेडिट लिमिटमध्ये वाढ आणि व्याज भरण्यासाठी मोरटोरिअमची सुविधा मिळू शकते. अर्थमंत्रालयाच्या आदेशानंतर बँकांनी याची तयारीही सुरू केली आहे. बँक ऑफ बडोदानेतर छोट्या व्यवसायिकांना दिलासा म्हणून विशेष कोविड इमर्जन्सी क्रेडीटचीही सुरुवात केली आहे. याअंतर्गत कोरोनाचा सामना करण्यासाठी एमएसएमईला अधिक रोख देण्याची योजना आहे. बँक ऑफ बडोदाने आपल्या सर्व 49 हजार एमएसएमईज ग्राहकांशी संपर्क करायलाही सुरुवात केली आहे.
रशियानं तयार केला 'महाबॉम्ब', एका क्षणात उद्ध्वस्त होऊ शकतं संपूर्ण जग
बँकांचे व्याज भरण्यासाठी मोरटोरिअम देण्याचीही तयारी -बँक ऑफ बडोदाच्या विशेष कोविड इमर्जन्सी क्रेडिट स्कीममध्ये छोट्या व्यवसायिकांना लोन रिस्ट्रक्चरिंगचा फायदा मिळू शकेल. यात, कंपन्यांच्या क्रेडिट लिमिटमध्ये वाढ करण्याचीही योजना आहे. बँकांच्या व्याज देयकांसाठीही मोरटोरिअम देण्याची तयारी आहे.
लॉक डाउनमुळे छोट्या व्यवसायांचे मोठे नुकसान -कोरोनाला रोखण्यासाठी देशात लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे एमएसएमईजला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. एमके ग्लोबल फायनांशिअल सर्व्हिसेसच्या मते, या काळाचा सामना करण्यासाठी एमएसएमईला सॉफ्ट लोन, कॅश ट्रांसफर आणि लोन रिस्ट्रक्चरिंगची आवश्यकता आहे. मजुरांवरही लॉकडाउनचा विपरित परिणाम होणार आहे. ट्रांसपोर्ट बंद असल्याने त्यांना घरी जाणेही अवघड झाले आहे. अर्थव्यवस्थेत असंघटित क्षेत्राचाही मोठा वाटा आहे. हे क्षेत्र अद्यापही नोटाबंदी आणि जीएसटीतून सावरू शकलेले नाही. तोच आता कोरोनाचे नवे संकट 'आ' वासून उभे राहिले आहे. लॉकडाउनमुळे अनेक छोटे व्यवसाय बंद करण्याचीही वेळ येऊ शकते.
CoronaVirus News: कोरोनाचा सामना करण्यासाठी जगाने 'या' देशाचे मॉडेल वापरावे - UN