नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाउनची घोषणा करण्यात आली. यामुळे बंद पडलेल्या प्रवासीरेल्वे गाड्या पुन्हा 12 मेपासून सुरू होत आहेत. मात्र यासंदर्भात, तिकट बुकिंग कशा प्रकारे होईल अथवा कोणकोणत्या मार्गांवरून रेल्वे धावेल, असे अनेक प्रश्न अनेकांच्या मनात आहेत. सुरूवातील काही मोजक्या रेल्वेच धावतील आणि याबरोबरच कोरोनाची तपासणीही केली जाईल.
असे कराता येईल बुकिंग -रेल्वे मंत्रालयाने सोशल डिस्टंसिंग लक्षात घेता, तिकीट बुकिंगसाठी अनेक नियम तयार केले आहेत. आता तुम्हाला रेल्वेस्थानकांवर जाऊन, रांगेत उभे राहून तिकीट मिळणार नाही. तर यासाठी आपल्याला https://www.irctc.co.in/nget/train-search वर जाऊनच तिकीट बुक करावे लागेल.
आणखी वाचा - LockdownNews : आता लॉकडाउन वाढला तर...?; 'असा' असेल केंद्र सरकारचा प्लॅन
कन्फर्म तिकीट असणाऱ्यांनाच रेल्वे स्थानकात प्रवेश -मिळालेल्या माहितीनुसार, ज्या प्रवाशांकडे वैध कन्फर्म तिकीट असेल, अशा प्रवाशांनाच रेल्वे स्थानकात प्रवेश दिला जाणार आहे. या रेल्वे गाड्यांच्या तिकीट बुकिंगला 11 मे सायंकाळी 4 वाजल्यापासून सुरुवात होईल. महत्वाचे म्हणजे, केवळ IRCTCच्या वेबसाइटवरूनच या गाड्यांचे तिकीट बुक करता येईल.
तोंड झाकलेले असणे आवश्यक -ज्या प्रवाशांकडे रेल्वेचे तिकीट असेल, केवळ त्यांनाच स्थानकांत प्रवेश मिळणार आहे. याशिवाय प्रवाशांना आपल्या तोंडावर रुमाल अथवा मास्क लावणेही बंधनकारक आहे. स्थानकाहून निघण्यापूर्वी प्रवाशाचे स्क्रीनिंग होईल. तसेच केवळ आणि केवळ प्रवाशांनाच ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी असेल.
आणखी वाचा - LockdownNews : एक आई अशी ही : रस्त्याच्या कडेला दिला बाळाला जन्म, नंतर त्याला कडेवर घेऊन चालली 160KM अंतर
केवळ या अटींवरच सेवा -रेल्वे विभागाने रेल्वे गाड्या सुरू केल्या असल्या तरी, संपूर्ण नेटवर्क खुले केलेले नाही. यामुळे आपल्याला कुठूनही आणि कोठेही जाता येणार नाही. सध्या आपल्याला केवळ 15 शहरांसाठीच रेल्वे सेवा घेता येणार आहे. या शरहांत, दिब्रूगड, अगरतळ, हावडा, पाटणा, बिलासपूर, रांची, भुवनेश्वर, सिकंदराबाद, बेंगळुरू, चेन्नई, तिरुवनंतपुरम, मडगाव, मुंबई सेंट्रल, अहमदाबाद आणि जम्मू तावी, या ठिकाणांचाच समावेश आहे.
आणखी वाचा - LockdownNews : 12 मेपासून पुन्हा धावणार रेल्वे गाड्या, सोमवारी सायंकाळपासून करता येईल रिझर्वेशन