लखनौ : स्थलांतरित मजुरांसाठी एक हजार बसेस चलविण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी काँग्रेस सरचिटनीस प्रियंका गांधी यांनी योगी आदित्यनाथ सरकारकडे केली होती. त्यांची ही मागणी योगी सरकारने मान्य केली आहे. यावर यूपी सरकारने एक हजार बसेसचे ड्रायव्हर आणि इतर आवश्यक माहिती मागवली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियंका गांधी यांच्या कार्यालयाने उत्तर प्रदेश मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधला असून संबंधित माहिती पाठवण्यात येत आहे.
CoronaVirus News: बापरे! कोरोनाचे नियम तोडले तर 'हा' मुस्लीम देश देणार जगातील सर्वात मोठी शिक्षा
यापूर्वी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेसवर खालच्या पातळीचे राजकारण करत असल्याचा आरोप केला होता. योगी म्हणाले, ''काँग्रेसकडून एक हजार बसेसची यादी मागवण्यात आली आहे. मात्र, अद्याप कुठल्याही प्रकारची यादी मिळालेली नाही. काँग्रेसने खालच्या पातळीचे राजकारण करू नये.'' काँग्रेसवर हल्ला करत योगी म्हणाले, ''तेव्हा हे लोक काय करत होते, म्हणजे, शोषणही करणार आणि नंतर प्रामाणिक पणाचा चेहराही दाखवणार, 'सौ चूहे खाकर बिल्ली हज करने चली', अशी अवस्था, आज काँग्रेस नेतृत्वाची झाली आहे.''
जगातील 10 सर्वात भयंकर चक्रीवादळं; यांच्या विनाशाचे तांडव आठवले, की आजही उडतो लोकांचा थरकाप
यावर काँग्रेसनेही पलटवार करत, यूपी काँग्रेसच्या ट्विटरवरून ट्विट केले, की ''योगी जी आतापर्यंत खोटेपणाने काम करत होते. म्हणत होते, की आम्ही तीन दिवसांपासून बसेसची यादी मागवली आहे. असो, आम्ही तर बसेस घेऊन उभे होतोच. उत्तर प्रदेशातील जनतेचे आभार, की आपण दबाव आणून या सेवा कार्यात अडणी निर्माण करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना निर्णय घेण्यास भाग पाडले. श्रमिक भाऊ-बहिणींनो मदत मिळणे आवश्यक होते.''
तत्पूर्वी, प्रियंका गांधी यांनी मुख्यमंत्री योगींना पत्र लिहून स्थलांतरित मजुरांसाठी बसेस चालवण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी केली होती.
CoronaVirus News : जंतुनाशक फवारल्याने कोरोना नष्ट होणार नाही, WHOने दिला 'गंभीर' इशारा!