नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात 25 मार्चपासून लॉकडाउन सुरू आहे. यामुळे शहरी भागांत राहणारे स्थलांतरित मजूर अेनेक संकटांचा आणि समस्यांचा सामना करत आपापल्या गावी परतत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी सुखदेव विहार उड्डानपुलावरून आपापल्या राज्यांत जाण्यासाठी निघालेल्या अशाच काही मजुरांची भेट घेतली आणि त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी, या मजुरांच्या समस्या समजून घेतल्या.
या मजुरांपैकी एक, देवेंद्र म्हणाले, राहुल गांधी अर्ध्या तासांपूर्वी अम्हाला भेटले. आम्ही हरियाणातून चालत आलो आहोत. त्यांनी आम्हाला गाडी उपल्बध करून दिली. ते म्हणाले, ही गाडी आम्हाला आमच्या घरापर्यंत सोडेल. यावेळी त्यांनी आम्हाला भोजन, पाणी आणि मास्कदेखील दिले.
आणखी वाचा - आनंदाची बातमी! : कोरोनावरील औषध सापडलं; 'ही' अँटीबॉडी 100 टक्के गुणकारी, अमेरिकन कंपनीचा दावा
राहुल गांधी मोदी सरकारला घेरण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहेत. लॉकडाउन काळातही त्यांनी सरकारच्या अनेक निर्णयांवर प्रश्न उपस्थित केले आहे. स्थलांतरीत मजुरांच्या मुद्द्यावरून तर ते प्रामुख्याने सरकार निशाणा साधत आहेत.
आणखी वाचा - धक्कादायक! कोरोना बरे झाल्यानंतरही सोडत नाही पिच्छा; चीनमधील डॉक्टरांनी दिला 'गंभीर' इशारा
मजुरांना कर्ज देणारं पॅकेज नको, खिशात पैसा द्या,तत्पूर्वी, राहुल गांधी यांनी एका पत्रकार परिषदेत मोदी सरकारवर हल्ला चढवत, लॉकडाऊनमध्ये शेतकरी, मजुरांचे हाल होत आहेत, त्यांना कर्ज देणारे पॅकेज नको, त्यांच्या खिशात पैसा द्यायला हवेत. लोक रस्त्यावर तहान-भुकेने चालत आहेत, त्यांना दिलासा देण्याची गरज आहे, असे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी यांनी म्हटले आहे.
आंतरराष्ट्रीय रेटिंगची काळजी करू नका -शेतकरी, मजुरांनी हा देश उभा केला आहे, त्यांना वाऱ्यावर सोडून चालणार नाही. भारताच्या आंतरराष्ट्रीय रेटिंगची काळजी करू नका. ते रेटिंग नंतरही सुधारू शकेल. सध्या देशात मजूर आणि शेतकऱ्यांचा विषय काळजीचा आहे. ते सध्या संकटात आहेत, त्यांना आधार द्या, रेटिंग आपोआप सुधारेल, असा टोलाही त्यांनी मोदी सरकारला लगावला आहे.