शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

Lockdown : प्रेमीयुगुल मालगाडीत लपून निघाले नाशिकला, गाडी गेली राजस्थानला अन् मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2020 11:26 PM

जीआरपीने संबंधित युगुलाची चौकशी केली असता, ते यूपीतील बरनाल प्रहलादपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मैनपुरी येथील असल्याचे समजले. जीआरपीने संबंधित पोलीस ठाण्याला याची माहिती दिली. यावर संबंधित मुलगी हरवल्याची तक्रार त्या पोलीस ठाण्यात दाखल असल्याचे समोर आले.

ठळक मुद्देलॉकडाउन असतानाच एक प्रेमीयुगुल उत्‍तर प्रदेशातील आग्रा येथून मालगाडीत लपून नाशिककडे निघाले होतेदिल्ली-मुंबई रेल्वे लाईनवरील हिंडौनसिटी रेल्वे स्थानकाजवळ गेटमॅनची नगजर पडली या युगुलावरसंबंधित मुलगी हरवल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल होती

आग्रा : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. अशातच एक प्रेमीयुगुल उत्‍तर प्रदेशातील आग्रा येथून एका मालगाडीत लपून नाशिककडे निघाले. विशेष म्हणजे ही मालगाडी उत्तर प्रदेशातून निघून राजस्थानात पोहोचली. तरीही या युगुलाचा कुणालाही थांगपत्ता लागला नाही.

अशी झाली पोलखोलदिल्ली-मुंबई रेल्वे लाईनवर असलेल्या हिंडौनसिटी रेल्वे स्थानकाजवळ एका क्रॉसिंगवर गेटमॅनची नजर मालगाडीच्या डब्ब्यात लपलेल्या प्रेमीयुगुलावर पडली. त्याने क्षणाचाही विलंब न करता, रेल्वे स्थानकाच्या मास्तरला या युगुलाची माहिती दिली. यानंतर स्टेशन मास्तरने ही मालगाडी हिंडौनसिटी रेल्वेस्थानकावर थांबवली आणि जीआरपीच्या मदतीने मालगाडीत लपलेल्या प्रेमीयुगुलाला खाली उतरवले. यानंतर गंगापूरसिटी जीआरपीला याची माहिती दिली. यानंतर गंगापूरसिटी जीआरपीने या प्रेमी युगुलाला ताब्यात घेऊन गंगापूरसिटीत नेले.

आणखी वाचा - Lockdown : 30 हजार रुपयांपेक्षा कमी पगार असणाऱ्यांना मिळणार मोठी 'भेट'? सरकार लवकरच करू शकतं घोषणा 

चौकशीत समोर आली अशी माहितीजीआरपीने संबंधित युगुलाची चौकशी केली असता, ते यूपीतील बरनाल प्रहलादपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मैनपुरी येथील असल्याचे समजले. जीआरपीने संबंधित पोलीस ठाण्याला याची माहिती दिली. यावर संबंधित मुलगी हरवल्याची तक्रार त्या पोलीस ठाण्यात दाखल असल्याचे समोर आले. जीआरपीने संबंधित प्रेमीयुगुलाच्या कुटुंबीयांना यासंदर्भात माहिती दिली आहे. यानंतर दोघांचेही कुटुंबीय यूपी पोलिसांसह गंगापूर सिटीसाठी रवाना झाले आहेत. 

आणखी वाचा - 'अशी' आहे रियाज नायकूच्या खात्म्याची 'इनसाइट स्टोरी'; भुयारातून करायचा ये-जा, जवानांनी तेथेच खोदली कबर

यासंदर्भात जीआरपी ठाण्याचे प्रमुख लक्ष्मण सिंह म्हणाले, संबंधित ठाण्याचे पोलीस आणि कुटुंबीय आल्यानंतर या प्रेमीयुगुलाला त्यांच्या स्वाधीन केले जाईल. प्रहलादपूर येथील आरती कटारिया आणि बरनाल प्रहलादपूर येथील सहदेव, अशी या प्रेमीयुगुलाची नावे आहेत.

आणखी वाचा - Lockdown : कोरोना नव्हे, जगभरात 'या' व्हायरसमुळे होणार 14 लाख अधिक मृत्यू

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUttar Pradeshउत्तर प्रदेशLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टNashikनाशिकMaharashtraमहाराष्ट्रPoliceपोलिसrailwayरेल्वे