LockdownNews : एक आई अशी ही : रस्त्याच्या कडेला दिला बाळाला जन्म, नंतर त्याला कडेवर घेऊन चालली 160KM अंतर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2020 09:08 PM2020-05-10T21:08:46+5:302020-05-10T21:17:12+5:30
बडवानी : सरकारच्या प्रयत्नांनंतरही हजारो मजूर, हजारो किमीचा पायी प्रवास करून आपापल्या घरी पोहोचत आहेत. या मजुरांची व्यथा ऐकून ...
बडवानी : सरकारच्या प्रयत्नांनंतरही हजारो मजूर, हजारो किमीचा पायी प्रवास करून आपापल्या घरी पोहोचत आहेत. या मजुरांची व्यथा ऐकून अंगावर अक्षरशः शहारे येतात. मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर, नवजात बाळाला घेऊन पोहोचलेल्या एका मजूर महिलेची कहाणी एकली, तर थरकाप उडाल्याशिवाय रहात नाही. मुलाला जन्म दिल्यानंतर 1 तासाने त्याला कडेवर घेऊन, ही महिला तब्बल 160 किलो मीटरचे अंतर पायी चालून बिजासन बार्डरवर पोहोचली आहे.
आणखी वाचा - LockdownNews : आता लॉकडाउन वाढला तर...?; 'असा' असेल केंद्र सरकारचा प्लॅन
या महिलेचे नाव आहे शकुंतला. ती आपल्या पतीसोबत नाशिकला रहात होती. प्रेग्नन्सीच्या 9 व्या महिन्यातच ती आपल्या पतीसोबत नाशिकहून सतना येथे जाण्यासाठी पायी निघाली. नाशिकहून सतनाचे अंतर जवळपास 1 हजार किलो मिटर एवढे आहे. तीने बिजासन बॉर्डरपासून 160 किलोमीटर आधीच 5 मेरोजी रस्त्याच्या कडेला एका मुलाला जन्म दिला.
मुलाला घेऊन बिजासन बॉर्डरवर पोहोचली महिला -
ही आई शनिवारी बिजासन बॉर्डरवर पोहोचली. यावेळी तिच्या हातातील नवजात मूल पाहून चेक-पोस्टवरील इंचार्ज कविता कनेश त्यांच्या जवळ तपासणीसाठी पोहोचल्या. त्यांच्याशी बोलल्या. तेव्हा सांगण्यासाठी काहीही शब्द नव्हते. या महिलेने 70 किलो मीटर चालल्यानंतर मुंबई-आग्रा महामार्गावरच एका मुलाला जन्म दिला. यावेळी त्यांना 4 महिला सहकाऱ्यांनी मदत केली. शकुंतलाचे बोलने ऐकून पोलीसही जाम झाले.
रस्त्यातच मिळाली मदत -
शकुंतला यांचे पती राकेश कौल टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना म्हणाले, प्रवास अत्यंत खडतर होता. मात्र, रस्त्यात आम्हाला दयाभावही दिसून आला. धुळ्यात एका शीख कुटुंबाने नवजात मुलासाठी कपडे आणि आवश्यक साहित्यही दिले. लॉकडाउनमुळे नाशकात उद्योग धंदे बंद आहेत. त्यामुळे नोकरीही गेली, असेही राकेश यांनी सांगितले.
बिजासन सीमेवर तैनात असलेल्या पोलीस अधिकारी कविता कनेश यांनी सांगितले, की येथे समूहाने आलेल्या मजुरांना भोजन देण्यात आले. मुलांना चपलाही दिल्या. यानंतर प्रशासनाने त्यांना येथून घरी पाठवण्याची व्यवस्था केली.