शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
2
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
3
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
4
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
5
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
7
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
8
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
9
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
10
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
11
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
12
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
13
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
14
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
15
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
16
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
17
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
18
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
19
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
20
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."

Coronavirus, Lockdown News: दहा लाख लोकांना रेल्वे पोहोचविणार गावी; राज्यांना द्यावे लागतील तिकिटाचे पैसे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2020 1:02 AM

कामगार, मजूर, विद्यार्थी, यात्रेकरूंचा समावेश; ४० लाख नागरिक अडकले विविध राज्यांत

नवी दिल्ली : देशव्यापी लॉकडाऊनमुळे विविध भागांत अडकलेल्या दहा लाखांहून अधिक कामगार, मजूर, विद्यार्थी, यात्रेकरू आणि पर्यटकांना दहा दिवसांत त्यांच्या गावी पोहोचविण्यासाठी भारतीय रेल्वे जोरदार तयारी करीत आहे. एवढ्या मोठ्या संख्येने लोकांना इच्छित ठिकाणी रेल्वेने नेण्याचा हा स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासातील सर्वात मोठा प्रयोग होय.

लॉकडाऊमुळे विविध राज्यांत अडकलेल्या लोकांची माहिती राज्यांकडून युद्धपातळीवर गोळा केली जात असून, या लोकांची संख्या ४० लाख असल्याचा अंदाज आहे. तथापि, रेल्वे मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर ‘लोकमत’ला सांगितले की, यापैकी १० लाख लोकांना रेल्वेने त्यांच्या गावी पोहोचविले जाईल. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून २० डब्यांच्या ट्रेनमध्ये १,०५० प्रवासी असतील. वाढीव लॉकडाऊन १७ मे रोजी संपण्याआधीच हे काम पूर्ण केले जाणार आहे.

श्रमिक एक्स्प्रेस चालविणारगुजरातमध्ये सर्वाधिक २० लाख लोक अडकले असून, त्यानंतर महाराष्टÑ, दिल्ली, तेलंगणा, कर्नाटक, मध्यप्रदेश, राजस्थान, प. बंगाल, ओडिशा आणि अन्य राज्यांतही मोठ्या संख्येने लोक लॉकडाऊनमुळे अडकले आहेत. रेल्वेतर्फे हजार ते बाराशे ‘श्रमिक एक्स्प्रेस’ चालविल्या जातील. राज्य सरकारतर्फे आपल्या राज्यांतील लोकांसाठी बसेसची व्यवस्था करण्यात आली असून, या बसेसने अन्य लोक आपापल्या इच्छित ठिकाणी रवाना होतील.

विविध राज्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार अडकलेल्या २० ते २२ लाख लोकांना बिहारला जायचे आहे. ७ ते ८ लोकांना उत्तर प्रदेशला जायचे आहे. विविध भागांत अडकलेल्या आपल्या राज्यांतील लोकांना आणण्यासाठी या दोन्ही राज्यांनी केलेली बस प्रवासाची ही आजवरची सर्वात भव्य व्यवस्था असेल. कुंभमेळा किंवा छटपूजेसारख्या धार्मिक कार्यक्रमासाठी एकाच ठिकाणी केल्या जाणाºया व्यवस्थेपेक्षाही ही व्यवस्था वेगळी आहे.

इतर राज्यांत अडकलेल्या स्थलांतरित लोकांना आणण्यास राजी नसलेले बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासाठी हे मोठे आव्हान आहे. केंद्र सरकारने त्यांना बिहारमध्ये पोहोचविण्याचे मान्य केल्याने मुख्यमंत्री नितीश कुमार यांना या लाखो लोकांना राज्यात प्रवेश देण्याशिवाय गत्यंतर नाही. परतलेल्या लोकांना आधी चौदा दिवसांसाठी क्वारंटाईन करणे आणि मोठ्या प्रमाणावर त्यांच्या चाचणीसाठी व्यवस्था करावी लागणार आहे.

रेल्वे या प्रवाशांसाठी तिकीट आकारणार असल्याने राज्यांवर आर्थिक बोझा पडणार आहे. राज्याच्या मागणीनुसार प्रवास तिकिटे संबंधित राज्यांना दिले जातील. राज्य सरकारने ही तिकिटे प्रवाशांना देऊन त्यांच्यांकडून तिकिटाचे पैसे घेऊन ते रेल्वेकडे द्यावेत, असे रेल्वेने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.लॉकडाऊननंतर राजस्थानमधील कोटा येथे अडकलेल्या ५०० विद्यार्थ्यांसह ४० बस रविवारी सकाळी दिल्लीत दाखल झाल्या. वैद्यकीय तपासणी केल्यानंतर या विद्यार्थ्यांना आपापल्या घरी सोडण्यात आले.कोटामधील सर्व विद्यार्थ्यांना परत आणले असून, त्यांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती नोडल अधिकारी राजीव सिंग यांनी दिली. परिवहनमंत्री कैलाश गेहलोत म्हणाले की, बस काश्मिरी गेट येथे पोहोचल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आणि नंतर त्यांना घरी सोडण्यात आले. दिल्ली सरकारने विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी पाठवलेल्या बस शनिवारी सकाळी कोटा येथे पोहोचल्या. बससोबत गेलेल्या अधिकाऱ्यांनी ही मोहीम राबवताना फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन केले.

विद्यार्थ्यांची थर्मल स्क्रिनिंगबसमध्ये बसण्यापूर्वी सर्व विद्यार्थ्यांची थर्मल स्क्रिनिंग करण्यात आली. एका बसमध्ये २० ते २२ विद्यार्थ्यांना बसवण्यात आले होते. बसमध्ये वैद्यकीय कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना परत नेण्यासाठी नेमण्यात आलेले अधिकारीही उपस्थित होते. मुले घरी परतत असल्याने पालकांनी आनंद व्यक्त केला. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याrailwayरेल्वे