Coronavirus News: हवं तर भाजपाचे झेंडे लावा, पण मजुरांसाठी बस सुरू करा; प्रियंका गांधींचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 07:47 PM2020-05-20T19:47:15+5:302020-05-20T19:48:08+5:30

Coronavirus News in Marathi : काँग्रेसने आत्तापर्यंत ६७ लाख लोकांना वेगवेगळ्या माध्यमातून मदत केलीय, आमच्या बसेस मजुरांसाठी आजही तयार आहेत, पण योगी सरकार मंजुरी देत नाहीए, असा दावाही त्यांनी केला.

Coronavirus Lockdown in UP: Put BJP stickers but let buses run: Priyanka Gandhi ajg | Coronavirus News: हवं तर भाजपाचे झेंडे लावा, पण मजुरांसाठी बस सुरू करा; प्रियंका गांधींचा टोला

Coronavirus News: हवं तर भाजपाचे झेंडे लावा, पण मजुरांसाठी बस सुरू करा; प्रियंका गांधींचा टोला

Next

कोरोनाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात भाजपा विरुद्ध महाविकास आघाडी, अर्थात ठाकरे सरकार यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. कोरोना संकट हाताळण्यात सरकार अपयशी ठरलंय, या सरकारने जनतेसाठी पॅकेज द्यायला हवं, पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिणाऱ्या शरद पवारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही पत्र लिहावं, अशी टीका-टिप्पणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल केली होती. त्याला राष्ट्रवादीचे आमदार आणि शरद पवारांचे नातू रोहित पवारांनी खोचक उत्तर दिलंय. त्यामुळे ही ट्विट्सची मालिका लांबतच जाण्याची चिन्हं आहेत.

देवेंद्र फडणवीसांवरील टीकेवरुन रोहित पवार आणि भाजपा आमदारात ‘तू तू मै मै’

''राजकारण करण्याऐवजी राज्याला मदत मिळवून देण्यासाठी फडणवीसांनी प्रयत्न करावेत''

'घराच्या अंगणाला 'रणांगण' बनवणं याला शहाणपण म्हणत नाहीत; उपमुख्यमंत्री भडकले'

त्याचवेळी, तिकडे उत्तर प्रदेशातही सत्ताधारी विरुद्ध विरोधकांमध्ये जुंपली आहे. तिथे भाजपाची सत्ता आहे आणि काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारविरोधात मोर्चा उघडला आहे. स्थलांतरित मजुरांसाठी बस सोडण्याच्या मुद्द्यावरून त्यांच्यात बरीच 'तू तू मैं मैं' सुरू आहे. अखेर आज, हवं तर बसवर भाजपाचे झेंडे लावा, पण मजुरांसाठी बससेवा सुरू करा, असा टोला प्रियंका गांधींनी लगावला. काँग्रेसने आत्तापर्यंत ६७ लाख लोकांना वेगवेगळ्या माध्यमातून मदत केलीय, आमच्या बसेस मजुरांसाठी आजही तयार आहेत, पण योगी सरकार मंजुरी देत नाहीए, असा दावाही त्यांनी केला.

लॉकडाऊनमुळे रोजगारच नसल्यानं हजारो स्थलांतरित मजूर आपापल्या गावी निघाले आहेत. मैलोन् मैल पायी जाणाऱ्या या मजुरांच्या सोयीसाठी उत्तर प्रदेश सरकार योग्य उपाययोजना करत नसल्याचा आरोप प्रियंका गांधी करत आहेत. काँग्रेसकडे १००० बसेस उपलब्ध आहेत, असं म्हणत त्यांनी पूर्ण यादीही प्रशासनाला पाठवली होती. मात्र, त्यात अनेक दुचाकी, एम्ब्युलन्स आणि कारचा समावेश असल्याचं सरकारचं निदर्शनास आणून दिलं. त्यावर, आमच्या यादीमध्ये काही चुका असल्यास आम्ही मान्य करतो, नवी यादी तुम्हाला पाठवतो, पण ज्या बसेस आहेत त्या चालवण्याची परवानगी द्या, अशी मागणी आज प्रियंका गांधींनी केली. हे मजूर म्हणजे देशाचा कणा आहेत, त्यांची काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे, असं नमूद करतानाच, हवं तर भाजपाचे झेंडे लावून बस चालवा, पण मजुरांची पायपीट थांबवा, असा टोमणा त्यांनी मारला.  

दरम्यान, स्थलांतरित मजुरांना त्यांच्या गावी नेण्यासाठी उत्तर प्रदेश राज्य परिवहन महामंडळाच्या १२ हजार बसेसची सोय करण्यात आली आहे, तसंच अन्य राज्यांमधून येणाऱ्या मजुरांचा खर्चही राज्य सरकार करणार असून आत्तापर्यंत १६ लाख कामगारांना यूपीत परत आणण्यात आलंय, असं स्पष्ट करत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेसचे आरोप फेटाळून लावले आहेत.

हेही वाचाः 

"काँग्रेस पाठवतंय राजस्थान सरकारच्या बसेस, आम्हाला आवश्यकता नाही", योगी सरकार अन् काँग्रेसमध्ये जुंपली

काँग्रेसची आमदार, पण भाजपाची 'मित्र'?; थेट प्रियंका गांधींनाच केला प्रतिप्रश्न

काँग्रेसच्या १००० बसेसवरुन वाद; प्रियंका गांधींच्या सचिवासह प्रदेश अध्यक्षाविरोधात एफआयआर

काँग्रेसचा स्थलांतरित मजुरांच्या भावनांशी खेळ; बसेसच्या यादीवर मोठा खुलासा

Web Title: Coronavirus Lockdown in UP: Put BJP stickers but let buses run: Priyanka Gandhi ajg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.