नवी दिल्ली – देशात लॉकडाऊन असूनही कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. आतापर्यंत २४ हजारांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर ७०० हून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राजधानी दिल्लीत कोरोनाग्रस्तांचा आकडा २ हजार ५०० पर्यंत पोहचला आहे. त्यामुळे कोरोना संक्रमण रोखण्यासाठी ३ मे नंतरही लॉकडाऊन वाढवण्याचा विचार सुरु आहे.
दिल्ली सरकारने कोरोनाविरुद्ध टॉप डॉक्टरांचे पॅनल बनवलं आहे त्यांनी दिल्लीत १६ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत दिले आहेत. सध्याची परिस्थिती पाहता लॉकडाऊन वाढवला पाहिजे असं मत सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मांडले आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिल्ली सरकारच्या डॉक्टर पॅनलचे प्रमुख एस के सरीन यांच्या हवाल्याने हे सांगितले आहे की, लॉकडाऊन १६ मे पर्यंत वाढवायला हवं. यामुळे कोरोना संक्रमणचा ग्राफ खाली उतरण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
जेव्हा डॉक्टर एस के सरीन यांना विचारलं की, दिल्लीत १६ मे पर्यंत लॉकडाऊन का गरजेचे आहे? त्यावेळी ते म्हणाले की, दिल्लीत कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण ३ मार्च २०२० रोजी आढळला. कोरोना महामारीला रोखण्यासाठी चीनच्या रेकॉर्डवर नजर ठेवल्यास त्यांचा संक्रमण आणि मृत्यू दर हा आकडा खाली येण्यासाठी कमीत कमी १० आठवडे लागले. यासाठी दिल्लीतही असं होऊ शकतं.
दिल्ली आरोग्य विभागाच्या माहितीनुसार एका दिवसात १३६ नवीन कोरोना रुग्ण आढळल्याने हा आकडा २ हजार ५१४ पर्यंत पोहचला आहे.तर एका दिवसात ३ जणांचा मृत्यू झाल्याने दिल्लीत आतापर्यंत मृतांचा आकडा ५३ इतका झाला आहे.
दरम्यान, आजपासून सर्वच दुकाने काही अटींवर उघडता येणार आहेत. गृह मंत्रालयाने तसा आदेश काढला असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या दुकानांमध्ये केवळ ५० टक्केच कामगार काम करू शकणार आहेत. केंद्र सरकारने २० एप्रिलपासून काही कंपन्यांना कमी स्टाफद्वारे काम करण्याची संमती दिली होती. तसेच दुरुस्ती करणाऱ्या लोकांनाही काम करण्याची परवानगी मिळाली होती. आता अन्य दुकानांना परवानगी काही अटींवर मिळाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
या आदेशामध्ये शॉपिंग मॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्सना परवानगी देण्यात आलेली नाही. देशात उद्यापासून काही व्यापारी व्यवहार होण्यास सुरुवात होऊ शकते. निवासी कॉलनीच्या जवळील दुकाने आणि स्टँड अलोन दुकाने आजपासून उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. यासाठी ही दुकाने नगरपालिका, महानगरपालिका क्षेत्रामध्ये असली पाहिजेत. तसेच शहरी सीमेच्या बाहेर येणाऱ्या दुकानांनाच परवानगी आहे. याशिवाय गृह मंत्रालयलाने काही अटीही लागू केल्या आहेत.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
Good News! देशवासियांची कोरोनावर मात; तब्बल ५०६३ रुग्ण ठणठणीत बरे
व्वा! राज बाबू; वाईन शॉप सुरु करा, मनसेच्या मागणीवर शिवसेनेची खोचक भूमिका, सांगितलं...
देशभरात काही अटींवर इतर दुकाने उघडणार; दारुच्या दुकानांबाबत घेतला हा निर्णय
“कदाचित बऱ्याच नेत्यांचा स्टॉक संपला असावा अशी शंका येते”; राज ठाकरेंना टोला
कोरोना संकटकाळात दोन चिमुरडे खासदार सुनील तटकरे यांच्या घरची वाट अडवतात तेव्हा...