Coronavirus: मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना कोरोनाची लागण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2020 01:04 PM2020-07-25T13:04:43+5:302020-07-25T13:55:08+5:30

देशात शनिवारी एकूण ४८ हजार ९१६ रुग्ण आढळले, तर शुक्रवारी ४९ हजार ३१० रुग्ण आढळले होते. मागील ४८ तासांत ९८ हजार २२६ नवीन कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत.

Coronavirus: Madhya Pradesh CM Shivraj Singh Chouhan says he has tested COVID19 positive | Coronavirus: मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना कोरोनाची लागण

Coronavirus: मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना कोरोनाची लागण

googlenewsNext

भोपाळ – मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. याबाबत स्वत: मुख्यमंत्र्यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे. त्यासोबत मागील काही दिवसांपासून संपर्कात येणाऱ्या लोकांना क्वारंटाईन होण्याचं तसेच कोरोना चाचणी करण्याचं आवाहन मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केले आहे.

याबाबत मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले की, माझ्यात कोविड १९ ची लक्षणं आढळली होती, त्यानंतर मी कोरोनाची टेस्ट केली, माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या लोकांना माझं आवाहन आहे, त्यांनी कोरोना चाचणी करावी आणि इतरांनी क्वारंटाईन व्हावं.

मध्य प्रदेशात आतापर्यंत कोरोनाचे २६ हजार २१० रुग्ण आढळले आहेत. यात ७ हजार ५५३ सक्रीय रुग्ण आहे. तर इतर १७ हजार ८६६ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. आतापर्यंत राज्यात ७९१ लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या ४८ तासांत भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येत जवळपास १ लाखांची वाढ झाली आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना करण्यात येत असल्या तरी दिवसाला कोरोना रुग्ण वाढत आहेत.

देशात शनिवारी एकूण ४८ हजार ९१६ रुग्ण आढळले, तर शुक्रवारी ४९ हजार ३१० रुग्ण आढळले होते. मागील ४८ तासांत ९८ हजार २२६ नवीन कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. तर देशात २४ तासांत ७८७ लोकांचा जीव गेला आहे. कोरोनापासून बचावासाठी जगभरातील वैज्ञानिक रात्रंदिवस मेहनत घेऊन लस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. अद्याप कोरोनावर कोणतीही लस अधिकृत जाहीर झाली नसली तरी ऑक्सफर्ड, रशिया यांच्या लसीने सकारात्मक परिणाम दिल्याचं सांगण्यात येत आहे.   

अन्य महत्त्वाच्या बातम्या

पैसै कमविण्यासाठी कोरोनाचा धंदा?; ‘त्या’ ऑडिओ क्लीपच्या हवाला देत भाजपाचा गंभीर आरोप

कृपया 'त्या' आकड्यांकडे लक्ष देऊ नका; उद्धव ठाकरेंनी सांगितलं कोरोनाचं 'अंकगणित'

...म्हणून डोक्यावरचे केस गेलेले दिसताहेत; उद्धव ठाकरेंनी सांगितलं खरं कारण

मी घरात बसून सगळीकडे जातोय, अख्खं राज्य कव्हर करतोय; उद्धव ठाकरेंनी विरोधकांना सुनावलं

Fact Check: मुलीच्या ऑनलाईन शिक्षणासाठी वडिलांनी गाय विकून मोबाईल खरेदी केला? या बातमीमागचं सत्य उघड

Web Title: Coronavirus: Madhya Pradesh CM Shivraj Singh Chouhan says he has tested COVID19 positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.