- नितीन अग्रवालनवी दिल्ली : कोरोनाचे सगळ््यात जास्त रुग्ण असलेल्या चार राज्यांत कोरोनातून बरे होण्याच्या दरात (रिकव्हरी रेट) दिल्ली सगळ््यात वेगाने प्रगती करत आहे. गेल्या दोन आठवड्यांत दिल्लीत हा दर २७ टक्क्यांनी वाढला आहे. या दरम्यान महाराष्ट्रात बरे होणाऱ्यांची टक्केवारी जवळपास ८ टक्क्यांंनी वाढली. परंतु, तमिलनाडू आणि गुजरातमध्ये हा दर २ टक्क्यांपेक्षा काहीसा वाढला आहे.कोरोनाच्या सरकारी आकडेवारीनुसार चार जुलैपर्यंत दिल्लीत ९७,२०० बाधितांपैकी ६८,२५६ रुग्ण बरे झाले. फक्त २ आठवड्यांपूर्वी संक्रमित झालेल्या लोकांपैकी फक्त ५५ टक्के बरेझाले होते.त्यावेळी एकूण ५६,७४६ बाधितांपैकी फक्त ३१,२९४ (५५.१४ टक्के) बरे झालेहोते. परंतु, आज त्यावेळच्याबरे होणाऱ्यांचे प्रमाण १२७.३४ टक्के झाले आहे.सगळ््यात जास्त रुग्ण असलेल्या महाराष्ट्रातही एकूण २,००,०६४ कोरोना बाधितांपैकी १,०८,०८२ (५४.०२ टक्के) बरे झालेहोते. दोन आठवड्यांपूर्वीपर्यंतरुग्णांची संख्या बरीच कमी म्हणजे फक्त १,२८,२०५ होती. त्यातील ६४,१५३ (५०.०३ टक्के) बरे झाले होते. याप्रकारे गेल्या दोन आठवड्यात रिकव्हरी दर जवळपास १०७.९७ टक्के झालाआहे.
coronavirus: दिलासादायक! महाराष्ट्रात रुग्ण बरे होण्याचा दर वाढला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2020 4:31 AM