coronavirus: एका व्यक्तीने चक्क एटीएममधून चोरलं सॅनिटायझर, व्हिडीओ पाहून आयपीएस अधिकारी म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 05:18 PM2021-04-30T17:18:18+5:302021-04-30T17:23:31+5:30
coronavirus in India : कोरोनापासून बचावासाठी हॉटेल, रेस्टॉरंट्स, विविध कार्यालये आणि एटीएममध्येही कोरोनापासून बचावासाठी आता सॅनिटायझरच्या बाटल्या ठेवल्या जात आहेत. मात्र सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला एक व्हिडीओ पाहून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.
नवी दिल्ली - देशात कोरोनाची साथ सुरू झाल्यापासून हँड सॅनिटायझरचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पूर्वी अगदी मोजक्या लोकांकडेच दिसणाऱ्या सॅनिटायझरच्या बाटल्या ह्या आता सर्रास सगळ्यांकडे दिसू लागल्या आहेत. हॉटेल, रेस्टॉरंट्स, विविध कार्यालये आणि एटीएममध्येही कोरोनापासून बचावासाठी आता सॅनिटायझरच्या बाटल्या ठेवल्या जात आहेत. मात्र सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला एक व्हिडीओ पाहून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती एटीएममधून चक्क सॅनिटायझरची बाटली चोरून नेताना दिसत आहे. ही घटना केरळमधील कोझिकोडे येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. (A man stole sanitizer from an ATM, IPS officer said, 'hum nhi sudhrenge' after watching the video )
येथील एका एटीएममध्ये एक व्यक्ती पैसे काढण्यासाठी आली होती. एटीएममधून पैसे काढल्यानंतर या व्यक्तीने हात सॅनिटाइझ करण्यासाठी ठेवलेली सॅनिटायझरची बाटलीही उचलून नेली. दरम्यान, हा व्हिडीओ पाहिल्यानंतर आपीएस अधिकारी दीपांशू काब्रा यांनी तो व्हिडीओ ट्विटरवर शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे. त्यात ते म्हणतात की, देशामध्या लाखो एटीएम आहेत. अशा मूर्खांपासून एटीएममधील सॅनिटायझर वाचवण्यासाठी प्रत्येक एटीएममध्ये २०० ते ३०० रुपयांचा पिंजरा लावावा लागला तर शेकडो कोटी रुपये खर्च होतील. तुमच्या मर्यादित आचरणामुळे हे पैसे वाचले असते. तसेच तुमच्याच भल्यासाठी खर्च झाले असते. असो, आम्ही सुधरणार नाही.
These are kleptomaniac. 😡
— Dipanshu Kabra (@ipskabra) April 30, 2021
देश मे लाखों ATM हैं. इन मूर्खों से सैनिटाइजर बचाने के लिए हर ATM में 200-300रु का पिंजड़ा लगाना पड़े तो सैकड़ों करोड़ रु इसी में लगेंगे.
आपके मर्यादित आचरण से ये पैसे बचते और आपकी भलाई में ही लगते...
खैर... #HumNahiSudhrenge. pic.twitter.com/6zB94qV9FC
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एटीएममध्ये आलेली व्यक्ती प्रथम तिथे असलेल्या हॅंड सॅनिटायझरने हात स्वच्छ केले. त्यानंतर एटीएम कार्ड काढून एटीएममधून पैसे काढले. त्यानंतर पुन्हा सॅनिटायझरच्या बाटलीकडे आणि सीसीटीव्हीकडे पाहिले. त्यानंतर त्याने ही सॅनिटायझरची बाटली उचलून बॅगेत टाकली आणि निघून गेला.