CoronaVirus News : अरे व्वा! 100 वर्षांच्या आजींनी जिंकलं 'कोरोना युद्ध'; टाळ्यांचा गजरात झालं स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2020 08:34 AM2020-05-23T08:34:57+5:302020-05-23T08:54:42+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना अनेकांनी कोरोनावर मात देखील केली आहे. 

CoronaVirus Marathi News 100 year old woman recovering covid19 indore SSS | CoronaVirus News : अरे व्वा! 100 वर्षांच्या आजींनी जिंकलं 'कोरोना युद्ध'; टाळ्यांचा गजरात झालं स्वागत

CoronaVirus News : अरे व्वा! 100 वर्षांच्या आजींनी जिंकलं 'कोरोना युद्ध'; टाळ्यांचा गजरात झालं स्वागत

Next

इंदूर - देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसागणिक वाढत आहे. कोरोना रुग्णांची संख्या एक लाख वीस हजारांच्या आसपास पोहोचली असून मृतांचा आकडा साडे तीन हजारांच्या वर गेला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात जवळपास दोन महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू आहे. देशातील 80 टक्के कोरोना रुग्ण केवळ पाच राज्यांमध्ये आहेत. यामध्ये महाराष्ट्र, गुजरात, तमिळनाडू, दिल्ली आणि मध्य प्रदेशचा समावेश होतो. याच दरम्यान अनेक दिलासादायक घटना समोर येत आहेत. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना अनेकांनी कोरोनावर मात देखील केली आहे. 

देशातील कित्येक लोकांनी कोरोना विरुद्धची लढाई जिंकली असून उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. अशीच एक घटना मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये घडली आहे. 100 वर्षांच्या वृद्ध महिलेने कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. इंदूर हे कोरोनाचा हॉटस्पॉट आहे. या हॉटस्पॉटमध्ये राहणाऱ्या या आजींनी कोरोनाविरोधातील युद्ध जिंकलं आहे. चंदाबाई परमार असं या 100 वर्षीय आजीचं नाव असून त्या इंदूरमधील नेहरू नगरमध्ये राहतात. 10 मे रोजी त्यांना अरविंदो रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 

चंदाबाई यांचा उपचारानंतर कोरोनाचा तिसरा रिपोर्ट निगेटिव्ह आला. यानंतर रुग्णालयाने त्यांना डिस्चार्ज दिला. डिस्चार्जनंतर त्यांना आपल्या घरी आणण्यात आलं. यावेळी नेहरू नगरमधील त्यांच्या शेजाऱ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. 10  मे रोजी त्यांना उपचारासाठी दाखल केलं गेलं. उपचारांना प्रतिसाद मिळाल्याने त्या बऱ्या झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.

कोरोनावर मात करणाऱ्या 100 वर्षीय आजींच्या 70 वर्षांच्या मुलाचा मात्र कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 4 मे रोजी त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला. सर्दी-तापाची लक्षणं दिसल्यावर त्यांचे नमुने कोरोना चाचणीसाठी पाठवण्यात आले. रिपोर्ट येण्यापूर्वीच त्यांची प्रकृती अचानक बिघडली आणि रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. यानंतर कुटुंबातील सर्वांनी कोरोनाची चाचणी करण्यात आली. यात सहा जण करोना पॉझिटिव्ह आढळून आले. त्यात आजींचाही समावेश होता अशी माहिती त्यांच्या नात सुनेने दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : तंत्रज्ञानाची किमया! 'हे' खास हेल्मेट घेणार कोरोना व्हायरसचा शोध; जाणून घ्या खासियत

CoronaVirus News : कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला तर शवविच्छेदनाची गरज आहे का?; ICMRने दिली महत्त्वाची माहिती

CoronaVirus News : आनंदाची बातमी! कोरोनाने थैमान घातलेलं असताना 'ही' आकडेवारी सुखावणारी

CoronaVirus News : 'ड' जीवनसत्त्वामुळे कोरोनावर करता येते मात?, शास्त्रज्ञ म्हणतात...

कुटुंब रुग्णालयात एकत्र झालं दाखल पण घरी परतली फक्त आई; मन सुन्न करणारी घटना

CoronaVirus News : कोरोनाच्या संकटात भूतदया! हेच असतं आईचं प्रेम; फोटो व्हायरल

 

Web Title: CoronaVirus Marathi News 100 year old woman recovering covid19 indore SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.