भोपाळ - कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. भारतात सध्याची स्थिती पाहता लॉकडाऊन 17 मेपर्यंत कायम राहणार आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढून 81,000 च्या वर गेला आहे. तर आतापर्यंत 2600 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. पंतप्रधानांनी लोकांना घरी राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच सोशल डिस्टंसिंग पाळण्यास सांगितलं आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहेत. विशेषत: कोरोना व्यतिरिक्त इतर रुग्णांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.
लॉकडाऊनमध्ये अनेक जण मदतीसाठी पुढाकार घेत असून एकमेकांना मदतीचा हात देत आहेत. तब्बल 200 मुलांचा एका व्यक्तीने जीव वाचवला असून थॅलेसेमियाग्रस्त चिमुकल्यांसाठी तो देवदूत ठरला आहे. निर्मल संतवानी असं या व्यक्तीचं नाव असून ते मध्य प्रदेशच्या ग्वालियरमध्ये राहतात. लॉकडाऊन लागू झाल्यापासून ते थॅलेसेमियाग्रस्त मुलांना रक्त उपलब्ध करून देण्यासाठी झटत आहेत. निर्मल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लॉकडाऊनमध्ये आतापर्यंत 6 कॅम्प लावून 173 युनिट रक्तदान केलं आहे.
ग्वालियरच्या चंबल भागातील 200 पेक्षा जास्त थॅलेसेमियाग्रस्त मुलांना वेळेत रक्त मिळाल्याने त्यांचा जीव वाचल्याची घटना समोर आली आहे. निर्मल संतवानी यांचा मुलगा करणलाही थॅलेसेमिया आहे. त्यामुळे या मुलांना रक्ताची गरज किती असते याची त्यांना चांगलंच माहिती आहे. त्यामुळे काहीही झालं तरी लॉकडाऊनमध्ये थॅलेसेमिया पीडित मुलांची मदत आपण करणार, असा ठाम निश्चय त्यांनी केला. तसेच त्यांनी लोकांशी संपर्क साधायला सुरुवात केली आणि त्यांना रक्तदान करण्यासाठी प्रोत्साहित केलं.
निर्मल यांना लोकांनीही साथ दिली. त्यामुळे लॉकडाऊनसारख्या परिस्थितीतही चंबल भागातील जवळपास 200 थॅलेसेमिया पीडित मुलांना वेळेत रक्त मिळालं आहे. थॅलेसेमिया हा आजार लहान मुलांमध्ये जन्मापासून असतो. या आजाराने ग्रस्त असलेल्या मुलांना प्रत्येकी 15 दिवसांनी रक्ताची गरज भासते. जोपर्यंत त्यांचं बोनमॅरो ट्रान्सप्लान्ट होत नाही तोपर्यंत त्यांना रक्ताची गरज भासते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : सरकारने मागवले 'हे' खास मशीन, आता 24 तासांत होणार 1200 सँपल टेस्ट
CoronaVirus News : ... म्हणून कोरोनाला रोखण्यात 'हे' 18 देश ठरले यशस्वी
प्रेरणादायी! व्याजाने पैसे घेऊन केली UPSC ची तयारी; IAS होऊन शेतकरी पुत्राची नेत्रदीपक भरारी
CoronaVirus News : नव्या रुग्णांच्या संख्येने चिंता वाढली, कोरोनाग्रस्तांचा आकडा 81 हजारांवर
CoronaVirus News : अमेरिकेने केला चीनवर गंभीर आरोप; सांगितलं कोरोना पसरण्यामागचं कारण
CoronaVirus News : पंतप्रधान नरेंद्र मोदींची बिल गेट्स यांच्याशी खास चर्चा; म्हणाले...