नवी दिल्ली - कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक उपाययोजना सुरू आहेत. कोरोनावर मात करण्यासाठी देशात 17 मे पर्यंत लॉकडाऊन सुरू आहे. भारतात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चालली आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या 62,000 हून अधिक झाली आहे. तर दोन हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोना व्हायरसपासून रुग्णांचा बचाव करता यावा यासाठी सर्वच क्षेत्रातील लोक अहोरात्र काम करत आहे. याच दरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
वेगाने पसरणाऱ्या कोरोनाने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी देश सज्ज झाला आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 30 एप्रिल रोजी देशातील सर्व जिल्ह्यांची एक लिस्ट केली होती. यात 130 जिल्हे रेड, 284 ऑरेंज आणि 319 जिल्हे ग्रीन झोन करण्यात आले आहेत. मात्र गेल्या आठवड्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ झाल्याने सरकारची चिंता आता आणखीच वाढली आहे. कारण ग्रीन झोनमध्ये रुग्णांची संख्या वाढत असल्यान ते रेड झोन होऊ शकतात अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
कोरोना रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली तर ग्रीन झोन हे रेड झोन होऊ शकतात अशी शक्यता दिल्ली एम्सचे वरिष्ठ डॉक्टर आणि टास्क फोर्सच्या सदस्याने वर्तवली आहे. ग्रीन झोन असलेल्या 20 जिल्ह्यांमध्ये 9 दिवसांत संक्रमणाची 283 नवीन प्रकरणं दिसत आहेत. त्रिपुरातील ग्रीन झोन जिल्ह्यांमधून संक्रमणाची सर्वात जास्त प्रकरणे समोर आली आहे. त्यानंतर ओडिशातील कित्येक राज्यांमध्ये नवीन प्रकरणं मिळाली आहे. पंजाबमध्येही अशीच परिस्थिती असल्याची माहिती मिळत आहे. ज्या जिल्ह्यांना ग्रीन झोन घोषित केले गेले तेथे एका आठवड्यात संक्रमणाची नवीन प्रकरणं पाहायला मिळाली आहेत.
त्रिपुराच्या धलाईमध्ये सर्वाधिक म्हणजे 86, ओडिशाच्या गंजम जिल्ह्यात 47, ओडिशाच्या जगतपूरमधील 05, ओडिशामधील मयूरभंज, बालांगीर, कटक, झारसुगुडामध्ये 2-2. पंजाबमधील बठिंडा आणि फतेहगडमध्ये 37-37, महाराष्ट्रातील सिंधूदुर्ग जिल्ह्यात 2, पंजाबमधील फाजिल्का येथे 20, पश्चिम बंगालच्या बीरभूम येथे 6, गुजरातमधील देवभूमी येथे 02 अशी प्रकरणं समोर आली आहेत. दर आठवड्याच्या आकडेवारीचा आढावा घेतल्यानंतर जिल्ह्यांची झोननिहाय यादी तयार केली जाईल. या कामासाठी, तज्ञांची टीम प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेणार असल्याचं आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : धक्कादायक! राज्यातील 786 पोलीस कोरोना पॉझिटिव्ह, सात जणांचा मृत्यू
CoronaVirus News : चिंताजनक! देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला, रुग्णांची संख्या 62,939 वर
CoronaVirus News : धोका वाढला! महाराष्ट्राने वाढवली सरकारची चिंता
CoronaVirus News : त्यांचा तो प्रवास ठरला अखेरचा! लॉकडाऊनमध्ये भीषण अपघात; 5 जणांचा मृत्यू, 11 जखमी
CoronaVirus News : 'हा' आजार असलेल्या कोरोनाग्रस्तांना मृत्यूचा तिप्पट धोका