नवी दिल्ली :गुजरात, महाराष्ट्र, दिल्ली आणि तामिळनाडूतील वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येने देशाची स्थिती अधिक गंभीर होत चालली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आंकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 3,970 नवे कोरोनाबाधित समोर आले. यातील 1,057 रुग्ण एकट्या गुजरातमध्ये आढळून आले. तर आज 103 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोना संक्रमितांची एकूण संख्या आता 85,940 झाली असून आतापर्यंत 2,752 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 30 हजारहून अधिक लोक ठणठणीत होऊन घरी परतले आहेत.
आणखी वाचा - आनंदाची बातमी! : कोरोनावरील औषध सापडलं; 'ही' अँटीबॉडी 100 टक्के गुणकारी, अमेरिकन कंपनीचा दावा
आज एकट्या अहमदाबादमध्ये आढळले 973 कोरोना रुग्ण -गुजरातमध्ये आज आढळलेल्या 1057 नव्या कोरोनाबाधितांमध्ये एकट्या अहमदाबादमधील 973 रुग्णांचा समावेश आहे. शहरात आतापर्यंत 8,144 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 493 जणांचा मृत्यू झाला आहे. यांपैकी 14 जणांचा शनिवारी मृत्यू झाला. आतापर्यंत गुजरातमधील संक्रमितांचा आकडा 10,989वर पोहोचला आहे.
दिल्ली 10 हजारच्या जवळ, तामिळनाडू 10 हजारच्या पुढे -राजधानी दिल्लीतील कोरोना बाधितांचा आकडा आता 9,333 वर गेला आहे. येथे आज 438 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर आतापर्यंत दिल्लीत 129 लोकांचा मृत्यू झाला आहे. संपूर्ण दिल्ली सध्या रोडझोनमध्ये आहे. याशिवाय तामिळनाडूमध्ये आज 477 नवे रुग्ण आढळून आले. याबरोबरच येथील कोरोना रुग्णांचा आकडा 10,585 वर पोहोचला आहे.
आणखी वाचा - धक्कादायक! कोरोना बरे झाल्यानंतरही सोडत नाही पिच्छा; चीनमधील डॉक्टरांनी दिला 'गंभीर' इशारा
महाराष्ट्राची स्थिती गंभीर -महाराष्ट्रातील कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढत होत आहे. हा आकडा आता तब्बल ३० हजार ७०६ वर जाऊन पोहोचला आहे. आज दिवसभरात राज्यात एकूण १६०६ नव्या रुग्णांचे निदान झाले. तर ५२४ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत राज्यभरात ७०८८ रुग्ण ठणठणीत होऊन घरी परतले आहेत. तर २२ हजार ४७९ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
महाराष्ट्रात आज ६७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची महाराष्ट्रात आज ६७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यात ४७ पुरुष तर २० महिलांचा समावेश आहे. या ६७ मृतांमध्ये ६० वर्ष किंवा त्यावरील ३८ रुग्ण आहेत, २५ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत, तर ४ जण ४० वर्षाखालील आहे. या ६७ रुग्णांपैकी ४४ जणांमध्ये (६६ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.
आणखी वाचा - Lockdown : राहुल गांधींनी घेतली स्थलांतरित मजुरांची भेट, रस्त्यावर बसूनच साधला संवाद