CoronaVirus News : त्यांचा तो प्रवास ठरला अखेरचा! लॉकडाऊनमध्ये भीषण अपघात; 5 जणांचा मृत्यू, 11 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2020 09:01 AM2020-05-10T09:01:04+5:302020-05-10T09:07:33+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: भारतात लॉकडाऊनसोबत तपासणीला गती दिली जात असताना संसर्गित रुग्णांची संख्या वाढत आहे. ही चिंताजनक बाब समोर असतानाच मध्य प्रदेशमध्ये एक भीषण अपघात झाला आहे.

CoronaVirus Marathi News 5 laborers killed 11 injured in madhyapradesh SSS | CoronaVirus News : त्यांचा तो प्रवास ठरला अखेरचा! लॉकडाऊनमध्ये भीषण अपघात; 5 जणांचा मृत्यू, 11 जखमी

CoronaVirus News : त्यांचा तो प्रवास ठरला अखेरचा! लॉकडाऊनमध्ये भीषण अपघात; 5 जणांचा मृत्यू, 11 जखमी

Next

जबलपूर - जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 59000 वर पोहोचली आहे. तर 1800 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. मात्र लॉकडाऊनमुळे अनेकांना काहीच काम नसल्याने त्यांनी आपल्या गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे. अनेकांनी पायी जाण्याचा पर्याय निवडला आहे. भारतात लॉकडाऊनसोबत तपासणीला गती दिली जात असताना संसर्गित रुग्णांची संख्या वाढत आहे. ही चिंताजनक बाब समोर असतानाच मध्य प्रदेशमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. 

लॉकडाऊन दरम्यान मध्य प्रदेशच्या नरसिंहपूर येथील पाठा गावाजवळ आंब्याचा ट्रक उलटून अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. या भीषण अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असून 11 जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आंब्याचा ट्रकमधून काही जण लपून आपल्या घरी जात होते. याच दरम्यान भीषण अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आंब्याच्या ट्रकमध्ये बसून सर्व मजूर आग्राला जात होते. त्याचवेळी ट्रक उलटून भीषण अपघात झाला. 

अपघाताची माहिती मिळताच पोलीस पोलीस घटनास्थळी दाखल झाले.  जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सिव्हिल सर्जन अनिता अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, गंभीर जखमी झालेल्या दोघांना जबलपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी एकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे तर दुसऱ्या मजुराला फ्रॅक्चर आहे. इतर जखमींची प्रकृती स्थिर आहे. जखमींपैकी एकाला तीन दिवस सर्दी, खोकला आणि ताप आहे. कोरोनाचा संशय असल्याने सर्व मजुरांची कोरोना चाचणी केली जाणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

काही दिवसांपूर्वी कोरोना व्हायरसमुळे काही काम नसल्याने आपल्या गावी जाणाऱ्या मजुरांच्या वाहनाचा तेलंगणातील शमशाबादमध्ये भीषण अपघात झाला होता. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला. कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे मजुरांना काम नाही. मिनी ट्रकमधून जवळपास 30 मजूर काम नसल्याने आपल्या गावी परतत होते. यावेळी ट्रकचा भीषण अपघात झाला आणि यामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला होता.

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : 'हा' आजार असलेल्या कोरोनाग्रस्तांना मृत्यूचा तिप्पट धोका

coronavirus: कोरोनाचा उद्रेक! जगभरात ४०.७२ लाख; देशात ६२ हजार, तर राज्यात २० हजार रुग्ण

 

Web Title: CoronaVirus Marathi News 5 laborers killed 11 injured in madhyapradesh SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.