नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वेगाने वाढत आहे. एकूण कोरोनाग्रस्तांची संख्येने 15 लाखांचा टप्पा पार केला आहे. देशामध्ये कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत असून एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 15,84,384 वर गेला आहे. तर आतापर्यंत देशभरात 35,003 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वच ठिकाणी खबरदारीचे उपाय केले जात आहेत. कोरोनाग्रस्तांवर रुग्णालयात योग्य उपचार केले जात असून अनेकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. याच दरम्यान एक अजब प्रकार समोर आला आहे.
क्वारंटाईन सेंटरमध्ये डॉक्टरांच्या जेवणाचं बिल हे तब्बल 50 लाख आल्याची घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या अलिगडमधील क्वारंटाईन सेंटरमध्ये हा अजब प्रकार घडला. मिळालेल्या माहितीनुसार, क्वारंटाईन सेंटरमध्ये 28 दिवसांत 84 डॉक्टरांच्या जेवणाचे बिल 50 लाख आले आहे. अतिरिक्त वैद्यकीय मुख्य सचिव डॉ. रजनीश दुबे यांना हे बिल पाहून धक्का बसला आहे. तर दुसरीकडे प्रशासनाने हे भलं मोठं बिल भरण्यास नकार दिला आहे.
हॉटेल चालकांनी दिलेल्या माहितीनुसार, विजेच्या बिलापासून ते हॉटेलचे कर्मचाऱ्यांना नियमित पगार दिले जात आहेत. आता शहरातील चार हॉटेल्स जिल्हा प्रशासनाद्वारे पाम ट्री डेव्हलपमेंट हॉटेलमार्फत उघडण्यात आली आहेत. ज्यामध्ये कोरोना योद्धा म्हणजेच डॉक्टरांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. शहरातील चार हॉटेलमध्ये 84 डॉक्टरांना 28 दिवसांसाठी वेगळे ठेवण्यात आले आहे. मात्र जिल्हा प्रशासनाने मार्चपासून कोणत्याही हॉटेल चालकाला पैसे दिलेले नाहीत.
हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष मानव महाजन यांनी 50 लाख रुपयांची थकबाकी असून जिल्हा प्रशासनाने मार्चपासून पैसे भरले नसल्याचं सांगितलं आहे. आम्हाला आमच्या कर्मचाऱ्यांना पगार द्यायचा आहे, विजेचं बिल भरायचं आहे. त्यामुळे थकबाकी लवकर न मिळाल्यास आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्रही लिहू आणि आवश्यकता असल्यास भेट घेऊ. अलिगडचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. भानू प्रतापसिंह कल्याणी यांनी '50 लाख रुपये तर नाही आहेत पण जे काही आहे, हा मुद्दा प्रधान सचिवांच्या बैठकीतही समोर आला, पैशाची व्यवस्था तुम्हाला करावी लागेल. सरकार त्यात काहीही करू शकणार नाही असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : आनंदाची बातमी! देशात तब्बल 10 लाख लोकांनी जिंकली कोरोनाची लढाई
CoronaVirus News : बापरे! उंच लोकांना कोरोनाचा सर्वाधिक धोका; रिसर्चमधून मोठा खुलासा
SSC Result 2020 : दहावीचा निकाल थेट 18 टक्क्यांनी वाढला; जाणून घ्या, 'मार्कांचा पाऊस' कसा पडला!
दिलदार सुपरहिरो! नोकरी गेली, इंजिनिअरवर भाजी विकण्याची वेळ आली; सोनू सूदने दिला मदतीचा हात
"नोकरी हिसकावली, जमवलेले पैसे हडपले, कोरोना रोखू शकले नाही मात्र 'ते' खोटी स्वप्न दाखवत राहिले"
CoronaVirus News : "राम मंदिर बांधल्यावर कोरोना देशातून पळून जाईल", भाजपा खासदाराचा दावा