नवी दिल्ली - कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशात 17 मे पर्यंत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेले अनेक मजूर देशातील विविध भागात अडकून पडले आहेत. तसेच यापैकी अनेक जण मिळेल त्या मार्गाने आपल्या घरी परतण्यासाठी प्रयत्न करत आहेत. दरम्यान, लॉकडाऊनच्या अटीशर्थींमध्ये सूट देऊन मजुरांना घरी परतण्याची सशर्त परवानगी देण्यात आली आहे. त्यानंतर विविध राज्यांची सरकारे आपल्या राज्यातील मजुरांना परत आणण्यासाठी काम सुरू केले आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने 'श्रमिक स्पेशल ट्रेन' सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला. मजूर, विद्यार्थी, पर्यटक, तीर्थस्थळांवर अडकलेले यात्रेकरू या विशेष ट्रेनने घरी पोहोचू शकणार आहेत.
विविध राज्यांमध्ये अडकलेल्या मजूर, विद्यार्थी, पर्यटक आणि यात्रेकरूंना आपापल्या राज्यांमध्ये पाठवण्यासाठी रेल्वेने गेल्या पाच दिवसांत 70 विशेष ट्रेन सोडल्या आहेत. या विशेष ट्रेनद्वारे तब्बल 80 हजार नागरिकांना सोडण्यात आले आहे. रेल्वेने याबाबत आता माहिती दिली आहे. सोमवारपर्यंत एकूण 55 ट्रेनने आपली पहिली फेरी पूर्ण केली किंवा प्रवास सुरू केला, तर आणखी मंगळवारी 30 ट्रेन सोडण्यात आल्या असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगळुरू, सूरत, साबरमती, जालंधर, कोटा आणि एर्नाकुलम येथून या ट्रेन सुरुवातीला सोडण्यात आल्या. प्रत्येक ट्रेनमधून जवळपास हजार प्रवासी प्रवास करू शकतात. तसेच राज्यांनी रेल्वेकडे ट्रेन सोडण्याची विनंती केल्यानंतर रेल्वे प्रशासन आणखी ट्रेन सोडेल. अशा प्रकारच्या आणखी 500 ट्रेन रेल्वे सोडू शकतं असंही अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, बिहार, गुजरात, तेलंगण आणि आंध्र प्रदेशात ट्रेन सोडण्यात आल्या आहेत.
उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांनी येणाऱ्या आणि जणाऱ्या ट्रेनचे भाडे आम्ही भरणार असल्याचे सांगितले आहे. तर, झारखंड आणि बिहार राज्यांनी राज्यात येणाऱ्या ट्रेनचेच भाडे देण्याची तयारी दाखवली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. लॉकडाऊनमुळे अनेक उद्योग-धंदे बंद झाले आहेत. हातावर पोट असणाऱ्यांचे हाल झाले आहेत. याच दरम्यान बेरोजगारीची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. देशातील बेरोजगारीचा दर हा 27.1 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) या संस्थेने बेरोजगारीची आकडेवारी जाहीर केली आहे. यामध्ये 3 मे रोजी संपलेल्या आठवड्यात देशातील बेरोजगारीचा दर 27.1 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका हा छोटे व्यावसायिक आणि मजुरांना बसला आहे. महिनाभरात 12 कोटींपेक्षा अधिक लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : कोरोनाचा फटका! लॉकडाऊनमुळे कोट्यवधी लोकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड