नवी दिल्ली - कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. अमेरिका, इटलीसारखे देश कोरोनापुढे हतबल झाले आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 50 लाखांवर गेली आहे. तर दुसरीकडे देशामध्ये कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णांची संख्यादेखील वाढतेच आहे. कोरोनामुळे देशातील स्थिती चिंताजनक आहे. यावर मात करण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. मात्र तरीही कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. याच दरम्यान एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
जगातील 15 देशांना कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. भारतापेक्षा या देशांमधील कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचे प्रमाण हे 83 पटीने अधिक आहे. जगातील 15 देशांची एकत्रित लोकसंख्या भारताइतकी असून, तिथे 36 लाख 45 हजार रुग्ण आहेत. जागतिक महासत्ता असलेली अमेरिका यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. भारताने मात्र वेळीच उपाययोजना करून कोरोना प्रसार मर्यादित करण्यात यश मिळवले आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत लव अगरवाल यांनी दिली आहे.
अमेरिका, रशिया, स्पेन, ब्राझिल, ब्रिटन, इटली, फ्रान्स, जर्मनी, तुर्की, इराण, पेरू, कॅनडा, सौदी अरेबिया, बेल्जियम, मॅक्सिको या 15 देशांचा यामध्ये समावेश आहे. देशात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता जवळपास 40 टक्क्यांवर पोहोचल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. गेल्या अडीच महिन्यांपेक्षा जास्त कालावधीत आरोग्य यंत्रणांनी केलेल्या प्रयत्नांमुळे हे यश प्राप्त झाले आहे. भारतात लाखापेक्षाही जास्त जणांना कोरोनाची लागण झाली होती. आता रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे.
विशेष म्हणजे पहिल्या लॉकडाऊनमध्ये कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अवघे 7.1 टक्के होते. चौथ्या लॉकडाऊनमध्ये हे प्रमाण तब्बल पाचपट करण्यात भारताला यश आले. दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये 11.42 टक्क्यांवरून तिसऱ्या टप्प्यात दुपटीपेक्षा जास्त 26.59 टक्क्यांवर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले होते. रुग्णसंख्येत दहा देशांच्या यादीत असूनही भारतात मृत्यूदर सर्वांत कमी आहे. स्पेनमध्ये सर्वाधिक 27.7 टक्के रुग्णांचा मृत्यू आतापर्यंत झाला. एक लाखामागे तेथे 59 जणांचा मृत्यू झाला. भारतात हे प्रमाण एक लाख रुग्णांमागे 0.2 टक्का आहे. लोकसंख्येच्या बाबतीत तुल्यबळ असलेल्या चीनच्या दाव्यानुसार हे प्रमाण 0.3 टक्का आहे.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : आनंदाची बातमी! कोरोनाने थैमान घातलेलं असताना 'ही' आकडेवारी सुखावणारी
CoronaVirus News : 'ड' जीवनसत्त्वामुळे कोरोनावर करता येते मात?, शास्त्रज्ञ म्हणतात...
कुटुंब रुग्णालयात एकत्र झालं दाखल पण घरी परतली फक्त आई; मन सुन्न करणारी घटना
CoronaVirus News : कोरोनाच्या संकटात भूतदया! हेच असतं आईचं प्रेम; फोटो व्हायरल
Cyclone Amphan : पश्चिम बंगालमध्ये 'अम्फान'चे थैमान! अनेकांचा मृत्यू, कोट्यवधीचं नुकसान