नवी दिल्ली - कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशातील लॉकडाऊन 31 मेपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात आतापर्यंत चार हजार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर कोरोनाग्रस्तांची संख्या सव्वा लाखांच्या वर गेली आहे. कोरोनाच्या संकटात लॉकडाऊनमुळे अनेकांचे विवाह लांबणीवर गेले आहेत. याच दरम्यान एका अनोख्या लग्नाची गोष्ट समोर आली असून सर्वत्र याच लग्नाची चर्चा रंगली आहे.
हरियाणातील सिरसा जिल्ह्यात एक कौतुकास्पद घटना समोर आली आहे. एका तरुणाने लग्न झाल्यावर घरी न जाता थेट रुग्णालय गाठल्याची घटना समोर आली आहे. सिरसामधील एका रुग्णालयासमोर अचानक फुलांनी सजलेली एक गाडी समोर येऊन उभी राहिली. हे पाहून सर्वच जण चकीत झाले. या गाडीतून एक नवविवाहीत जोडपं खाली उतरलं. लग्न झाल्यानंतर नववधूला घेऊन नवरदेव घरी गेला नाही तर कोरोना टेस्ट करण्यासाठी रुग्णालयात पोहोचल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हरियाणातील एका तरुणाचा पंजाबमधील तरुणीशी लग्न झाले. जिल्हा प्रशासनाच्या परवानगीने काही मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत विवाह सोहळा पार पडला. त्यानंतर नवरदेव आणि नवरी सिरसा पोहोचले. मात्र घरी जाण्यापूर्वी फुलांनी सजलेली गाडी घेऊन ते सरळ सिव्हिल रुग्णालयात गेले. तेथे सर्वप्रथम दोघांची कोरोना चाचणी करण्यात आली. रुग्णालयातील डॉ. सुरेंद्र नैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवरा, नवरी लग्नानंतर घरी जाण्यापूर्वी आधी कोरोनाची चाचणी करण्यासाठी रुग्णालयात आले. लोकांनी देखील अशाप्रकारे चाचणी करुन घेण्यासाठी पुढे यायला हवं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
देश कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी सज्ज झालेला असतानाच देशातील रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही सव्वा लाखांहून अधिक झाली आहे. संसर्ग रोखण्यासाठी सर्वतोपरी योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. त्यानंतर देशभरात 31 मेपर्यंत संपूर्ण ‘लॉकडाऊन’ची घोषणा केली आहे. कोरोना व्हायरसविरोधात अद्याप प्रभावी असं औषध किंवा लस उपलब्ध झालेली नाही. मात्र इतर आजारांवरील औषधांचं ट्रायल कोरोनाविरोधात केलं जातं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
देशात उष्णतेची लाट! 'या' 5 राज्यांत 'रेड अलर्ट'; 47 डिग्रीपर्यंत पोहचू शकतं तापमान
CoronaVirus News : धक्कादायक! केस कापायला गेले अन् कोरोना घेऊन आले; तब्बल 91जण पॉझिटिव्ह झाले
CoronaVirus News : कोरोना नाही तर 'या' गोष्टींची वाटतेय लोकांना सर्वात जास्त भीती
सुपरफास्ट तंत्रज्ञान! फक्त एका सेकंदात तब्बल 1000 चित्रपट डाऊनलोड; इंटरनेट स्पीडचा वर्ल्ड रेकॉर्ड
CoronaVirus News : बापरे! आईच्या आजारपणाचं खोटं कारण देऊन पास मिळवला, रेड झोनमध्ये गेला अन्...