नवी दिल्ली - देशात कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असून रुग्णांचा आकडा 27,02,743 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 55,079 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 876 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 51,797 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान कोरोनावर युद्धपातळीवर संशोधन करण्यात येत आहे.
देशात पहिल्यांदाच कोरोनाग्रस्ताच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून यामधून महत्त्वाची माहिती समोर येणार आहे. कोरोना रुग्णांवर संशोधन करणं हा यामागचा मुख्य उद्देश आहे. शरीरात किती वेळ कोरोना व्हायरस जिवंत राहतो. शरीरातील अवयवांना त्यांचा धोका कितपत असतो. तसेच त्याचा प्रभाव किती काळ असतो अशा सर्व गोष्टींची माहिती यामधून मिळणार असल्याने शवविच्छेदन अत्यंत महत्त्वाचं असल्याचं म्हटलं जात आहे.
कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी कोरोनाग्रस्तांच्या मृतदेहांचे शवविच्छेदन केले जात नाही. तसेच त्याला परवानगीही देण्यात आलेली नाही. मात्र भोपाळच्या AIIMS ने ICMR (इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च) कडून याबाबत परवानगी घेतली होती. त्यास मंजूरी मिळाल्यानंतरच देशात पहिल्यांदा कोरोना रुग्णाचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांच्या टीमने पीपीई किटसह सुरक्षेची सर्व काळजी घेतली होती.
कोरोनाग्रस्तांच्या आणखी काही मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. त्यानंतर अंतिम रिपोर्ट तयार करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. कोरोनाचा शरीरावर किती परिणाम होतो. तो कोणत्या अवयवांचे नुकसान करतो. तसेच त्याबाबत असणारी बरीच माहिती ही शवविच्छेदनातून मिळू शकते असं डॉक्टरांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने दोन कोटींचा टप्पा पार केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : कोरोनाचा धसका! वडिलांचे अंत्यसंस्कार करण्यास मुलाने दिला नकार, शेवटी...
बापरे! ...अन् उपमुख्यमंत्र्यांच्या बहिणीने घेतला दुकानदाराचा चावा, जाणून घ्या नेमकं काय घडलं?
"राहुल आणि सोनिया गांधी यांनी चीनकडून पैसे घेतले", भाजपा अध्यक्षांचा हल्लाबोल
Bihar Flood : नि:शब्द! बिहारला पुराचा तडाखा, मन हेलावून टाकणारा फोटो व्हायरल
"काँग्रेसच्या 100 नाराज नेत्यांनी सोनियांना पाठवलेलं पत्र, केली होती 'ही' मागणी"
...म्हणून रोहित पवारांनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार
Video - कडक सॅल्यूट! 16 तास पाण्यात अडकलेल्या तरुणाची वायुदलाने अशी केली सुखरुप सुटका
CoronaVirus News : कोरोनापेक्षाही भयंकर व्हायरस आला! संक्रमणाचा धोका दहापटीने वाढला