नवी दिल्ली : कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्यापासून एरव्ही राजकारणात कमालीचे अॅक्टिव्ह असलेले भाजपाचे चाणक्य अमित शहा कुठेच दिसले नव्हते. यामुळे त्यांची प्रकृती गंभीर असल्याच्या बातम्या येऊ लागल्या होत्या. विरोधकांनी तर अमित शहा कुठे गायब झाले, असे प्रश्नही विचारायला सुरुवात केली होती. तबलिगी जमात प्रकरणावेळी एनएसए अजित डोवाल यांना मध्यस्थी करण्यासाठी पाठविल्याची एकच घडामोड या काळात शहांच्या नावावर होती. यामुळे शंकेची पाल चुकचुकत होती.
मात्र, आज अमित शहा यांनी माझ्या प्रकृती अस्वास्थ्याच्या अफवा असल्याचे म्हटले आहे. काही मित्रांनी सोशल मि़डीयावर माझ्या प्रकृतीविषयी अनेक अफवा पसरवल्या. एवढेच नाही तर काहींनी माझ्या मृत्यूसाठीही प्रार्थना केली आहे. देश कोरोना सारख्या जागतिक महामारीविरोधात लढत आहे आणि मी गृह मंत्री म्हणून दिवस रात्र कामात व्यस्त होतो. यामुळे या अफवांकडे लक्ष दिले नव्हते. जेव्हा माझ्या हे लक्षात आले की माझी तब्येत खराब असल्याचा काल्पनिक आनंद या अफवा पसरविणाऱ्यांना होत आहे, तेव्हा मी यावर खुलासा न करण्याचाच निर्णय घेतला.
मात्र, माझ्या पक्षाच्या लाखो कार्यकर्त्यांनी गेल्या दोन दिवसांपासून चिंता व्यक्त केली, त्यांच्यासाठी मला समोर यावे लागत असल्याचे शहा यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे. मी पूर्णपणे ठणठणीत असून मला कोणताही आजार नाहीय. हिंदू धर्माानुसार अशा प्रकारच्या अफवा प्रकृती आणखी ठणठणीत ठेवतात. यामुळे मी अशा सर्व लोकांकडून एकच आशा व्यक्त करतो, की यापुढे तुम्ही मला माझे काम करू द्याल आणि स्वत:ही कराल. तुमच्याप्रती माझ्या मनामध्ये कोणताही द्वेष नसल्याचे शहा यांनी म्हटले आहे.
अमित शहा काय करत होते ?
2 मे रोजी अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत कोरोनामुळे नुकसान झालेल्या कृषी क्षेत्राला प्रोत्साहन देण्याच्या बैठकीत सहभाग घेतला होता.
सीआयएसएफच्या अधिकाऱ्यांनी कोरोनाशी लढण्यासाठी पंतप्रधान निधीला मदत निधी दिला. त्याचा चेक ४ मे रोजी अमित शहांना देण्यात आला.
लॉकडाऊन काळात अमित शहांच्या घरी दुसऱ्या नातीचा जन्म झाला. यासाठी ते गुजरातलाही गेले नव्हते. देशावरील संकटात प्रशासनाच्या बैठका, मंत्रालयातील बैठका आणि नियोजनाचे काम ते रात्री उशिरापर्यंत करत होते. विविध राज्यांदरम्यान ताळमेळ राखणे या काळात खूप महत्वाचे होते. त्या राज्यांना लागणारी मदत, पुरवठा, लॉकडाऊनचे नियोजन, विविध नियम बनविणे आदींचे काम गृह मंत्रालयातून होत होते.
अन्य महत्वाच्या बातम्या...
नादखुळा...! वय वर्ष ५ अन् एसयुव्ही घेऊन खरेदी करायला निघाला लॅम्बॉर्गिनी
छत्तीसगडचे पहिले मुख्यमंत्री अजित जोगी व्हेंटिलेटरवर; प्रकृती गंभीर