नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 4 लाखांवर गेली आहे. तर एकूण बळींचा आकडा 13 हजार 700 पार गेला. गेले 11 दिवस देशात रोज 10 हजारांहून अधिक रुग्ण आढळत आहेत. नवे रुग्ण आढळत असतानाच बरे होऊ न घरी परतणाऱ्यांची वाढती संख्या ही समाधानाची बाब आहे. जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढतच असून अनेक कंपन्या त्यावरील लस शोधत आहेत. त्यासाठी जगभरात संशोधन सुरू आहे. काही दिवसांपूर्वी पतंजलीचे संस्थापक रामदेव बाबा यांनी माझ्याकडे कोरोना बरा करण्याचा उपाय आहे. माझ्याकडे असलेलं औषध 100 टक्के गुणकारी असल्याचा दावा केला आहे.
पतंजली मंगळवारी (23 जून) कोरोनाचं पहिलं आयुर्वेदिक औषधं 'कोरोनिल' जगासमोर आणणार आहे. आचार्य बालकृष्ण हे आज दुपारी 12 वाजता हरिद्वारच्या पतंजली योगपीठात कोरोनाचं आयुर्वेदिक औषध 'कोरोनिल' लाँच करणार आहेत. रामदेव बाबाही यावेळी उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे. आचार्य बालकृष्ण यांनी ट्विटरवरून याबाबत माहिती दिली आहे. गिलॉय आणि अश्वगंधाच्या मदतीने कोरोनावर खात्रीने उपचार होऊ शकतो, असं रामदेव बाबांनी म्हटलं आहे. 'कोरोना विषाणू शरीरात शिरताच तो आतील यंत्रणेला त्रास देतो. विषाणूचा गुणाकार होतो आणि तो जास्तीत जास्त पेशींना संक्रमित करतो. ही साखळी तोडण्याचं काम गिलॉय वनौषधी 100 टक्के करू शकते,' असं रामदेव बाबा म्हणाले आहेत.
कोरोनाग्रस्तांना गिलॉय आणि अश्वगंधा देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. 'गिलॉय आणि अश्वगंधा देण्यात आलेल्या रुग्णांचं बरं होण्याचं प्रमाण 100 टक्के आहे. तर मृत्यूदर शून्य टक्के आहे. जीवघेण्या कोरोना विषाणूचा सामना करण्याची क्षमता आयुर्वेदात आहे. आयुर्वेद केवळ कोरोना रुग्णांवर उपचार करत नाही, तर तो विषाणूच्या मुळावरच घाव घालतो' असंही रामदेव बाबा यांनी सांगितलं आहे. आचार्य बालकृष्ण यांनी पतंजलीने कोरोनावरील औषध तयार करण्यात यश मिळवले आहे. एवढेच नाही, तर या औषधाने 1 हजार हून अधिक रुग्ण बरे झाले असल्याचा दावाही केला आहे.
वेगवेगळ्या ठिकाणी अनेक कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना हे औषध देण्यात आले. यांपैकी 80 टक्के लोक ठणठणीत झाले आहेत, असेही बालकृष्ण म्हणाले. तसेच आतापर्यंत पतंजली रिसर्च इन्स्टिट्यूटने त्यांच्या औषधाने बरे झालेल्या कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांचा डेटा तयार केला आहे. कोरोनामधील वेगवेगळ्या टप्प्यांचा आणि सर्व वयोगटातील लोकांचा डेटा आहे. शेकडो लोकांवर क्लिनिकल चाचण्या सुरू करण्यात आल्या आहेत. पतंजली संशोधन संस्था लवकरच जगातील प्रतिष्ठित विज्ञान जनरलमध्ये हा पेपर प्रकाशित करणार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : आशेचा किरण! कोरोना हरणार, देश जिंकणार; 'ही' तीन औषधं व्हायरसला टक्कर देणार
India China Faceoff : भारताला लुबाडण्यासाठी चीनची 'नवी चाल'; 'या' आवश्यक वस्तूंचे वाढणार भाव
ही दोस्ती तुटायची नाय! मधमाश्यांचा भन्नाट मित्र पाहिलात का?; Video पाहून हैराण व्हाल
'काँग्रेसच्या छळामुळे एका डोळ्याची दृष्टी गेली, मेंदूला सूज आली', भाजपा खासदाराचा गंभीर आरोप
चहा विक्रेत्याच्या लेकीची कौतुकास्पद कामगिरी, फ्लाईंग ऑफिसर होऊन नेत्रदीपक भरारी
CoronaVirus News : कोरोनाचा उद्रेक! तब्बल 81 देशांमध्ये दुसरी लाट; WHO ने दिला गंभीर इशारा