नवी दिल्ली - कोरोनामुळे देशातील स्थिती चिंताजनक आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली असून आता चिंता वाढवणारी आकडेवारी पुन्हा एकदा समोर आली आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 10,77,618 वर पोहोचली आहे. कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्यावर अनेक ठिकाणी नातेवाईकांनी देखील त्यांच्याकडे पाठ फिरवल्याच्या घटना घडत आहेत. रुग्णालयात मृतदेह पडून राहीले आहे. मृत्यूनंतरही कोरोना रुग्णांच्या मृतदेहांचे हाल होत आहेत.
बंगळूरूमध्ये देखील कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोना रुग्णांची संख्याही सातत्याने वाढत आहे. कोरोनाग्रस्तांच्या अंत्यसंस्कारासाठी खूप वेळ वाट पाहावी लागत असून स्मशानभूमीच्या बाहेर रुग्णवाहिकेच्या लांबच लांब रांगा लागल्याची माहिती मिळत आहे. बंगळूरूच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी मृतदेह येतात. मात्र सध्या कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याने अंत्यसंस्कारासाठी बराच वेळ वाट पाहावी लागत आहे.
स्मशानभूमी बाहेर रुग्णवाहिकेच्या रांगा लागल्या असून त्यातील मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात खूप वेळ जात असल्याची माहिती स्मशानभूमीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी दिली आहे. बंगळूरू महानगर पालिका (BBMP) ने दिलेल्या आकडेवारीनुसार, या क्षेत्रात 1 मे 2020 ते 17 जुलै 2020 पर्यंत 4 हजार 278 लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र मृतांमध्ये कोरोनाग्रस्तांसह इतरही लोकांचा समावेश आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेकांनी कोरोनाचा धसका घेतला असून आपल्या नातेवाईकांचे मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला आहे. पतीचा मृतदेह हातगाडीवरुन नेऊन पत्नी आणि मुलाने अंत्यसंस्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अथनी या गावात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. मात्र गावकरी आणि नातेवाईकांनी कोरोनाच्या भीतीने अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला. पतीच्या मृतदेहाला हात लावण्यासाठी कोणीही पुढे आलं नाही त्यामुळे पत्नीने आपल्या मुलांसोबत हातगाडीवरून पतीचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत नेल्याची मन सुन्न करणारी घटना घडली. या घटनेचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Aadhaar संबंधित प्रश्न असल्यास आता नो टेन्शन! Tweet करताच मिळणार उत्तर
लखनऊ-आग्रा महामार्गावर भीषण अपघात; 5 जणांचा मृत्यू, 18 जखमी
CoronaVirus News : मच्छर चावल्याने खरंच कोरोनाची लागण होते?; रिसर्चमधून समोर आली महत्त्वाची माहिती
'मोदी सरकारच्या भ्याडपणाची मोठी किंमत देशाला मोजावी लागेल'; राहुल गांधींचा हल्लाबोल
"कोरोनापासून बचावासाठी गोमूत्र प्या", भाजपा नेत्याचा अजब सल्ला