नवी दिल्ली - कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक उपाययोजना सुरू आहेत. कोरोनावर मात करण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. भारतात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चालली आहे. रुग्णांचा आकडा 9,06,752 वर पोहोचला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 23,727 लोकांना जीव गमवावा लागला आहे. कोरोना व्हायरसपासून लोकांचा बचाव करता यावा यासाठी सर्वच क्षेत्रातील लोक अहोरात्र काम करत आहे. याच दरम्यान एक धक्कादाक घटना समोर आली आहे.
पश्चिम बंगालमध्ये कोरोनाच्या संकटात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या एका महिला अधिकाऱ्याचा कोरोनाचा संसर्ग झाल्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. देवदत्ता रे असं या महिला अधिकाऱ्याचं नाव आहे. पश्चिम बंगालच्या हुगली जिल्ह्यातील चंदननगर उपविभागात उपदंडाधिकारी म्हणून त्या कार्यरत होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, ड्यूटीदरम्यान देवदत्ता यांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाची काही लक्षणं दिसू लागल्यावर त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आलं.
देवदत्ता यांची तब्येत आणखी बिघडल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र दुसऱ्या दिवशी त्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देवदत्ता रे यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. ममता बॅनर्जी यांनी देवदत्ता यांच्या कर्तव्यनिष्ठेला सलाम केला आहे. ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. देवदत्ता रे यांच्यावर ट्रेनमधून बंगालमध्ये परतणाऱ्या परप्रांतीय मजुरांची जबाबदारी होती.
देवदत्ता यांनी माणुसकी आणि संवेदनशीलता दाखवत ज्या पद्धतीने त्यांनी परिस्थिती हाताळली त्याचं सर्वत्र कौतुक केलं जात होतं. त्यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 28,498 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 553 जणांचा मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट म्हणजेच रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 63.02% झाले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
CBSE Results 2020 : मोठी बातमी! CBSE बोर्डाचा दहावीचा निकाल उद्या होणार जाहीर
चीनने 59 अॅप्सच्या बंदीवर पुन्हा एकदा विचारला प्रश्न, भारताने दिलं 'हे' सडेतोड उत्तर
बंगल्यात आणखी काही दिवस राहू द्या, प्रियंका गांधींनी केली मोदींना विनंती?, जाणून घ्या सत्य
Vikas Dubey Encounter : विकास दुबेचा आणखी एक प्लॅन आला समोर, रिक्षाचालकाने केला खुलासा
Google भारतात 75 हजार कोटींची गुंतवणूक करणार, सुंदर पिचाईंची मोठी घोषणा