नवी दिल्ली - देशात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत असून रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोनावर जगभरात युद्धपातळीवर संशोधन सुरू असून अनेक ठिकाणी चाचण्यांना यश आलं आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. देशातही कोरोना लसीवर काम सुरू आहे. याच दरम्याने स्वदेसी लसीसंदर्भात एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. देशात विकसित होत असलेल्या भारत बायोटेक कंपनीच्या Covaxin बाबत आनंदाची माहिती मिळत आहे.
स्वदेशी लसीची प्राण्यांवरील चाचणी यशस्वी झाली आहे. भारत बायोटेक कंपनीने मोठी घोषणा केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, लाईव्ह व्हायरल चॅलेंज मॉडेलमध्ये प्राण्यांवर केलेल्या प्रयोगात ही लस सुरक्षित असल्याचं दिसून आलं आहे. बायोटेकने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबतचं ट्विट देखील केलं आहे. माकडांवर केलेल्या लशीच्या प्रयोगानंतर त्यांच्यातील रोगप्रतिकारक शक्ती विकसित झालेली दिसून आली आहे. भारत बायोटेक आणि आयसीएमआर मिळून कोवॅक्सीन विकसित करत आहे.
स्वदेशी चाचणीच्या दुसऱ्या टप्प्यातील चाचणीला मंजुरी मिळाली आहे. कोवॅक्सीनच्या दुसऱ्या टप्प्यातील चाचणीला सात सप्टेंबरपासून सुरुवात झाली आहे. कोरोनावर लस विकसित करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. ऑक्सफोर्डच्या कोरोना लसीची चाचणी रोखण्यात आली आहे. लसीची चाचणी झालेल्या एका स्वयंसेवकावर दुष्परिणाम दिसून आल्यानंतर ऑक्सफर्डच्या कोरोना लसीची चाचणी तातडीने थांबवण्यात आली आहे. आता जागतिक आरोग्य संघटनेने या घटनेबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने दिली महत्त्वाची माहिती
कुठल्याही परिस्थितीत कोरोना लसीच्या सुरक्षिततेबाबत तडजोड केली जाणार नाही असे डब्ल्यूएचओने स्पष्ट केले आहे. कोरोनावरील लस विकसित करताना सर्व नियमांचे पालन केले गेले पाहिजे. तसेच लोकांना औषधे आणि लस देण्यापूर्वी त्याच्या सुरक्षिततेची तपासणी होणे आवश्यक आहे. ब्रिटनमध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अॅस्ट्राजेनेका यांनी विकसित केलेली कोरोनाची लस घेणाऱ्या एका स्वयंसेवकाच्या प्रकृतीवर गंभीर परिणाम दिसून आल्यानंतर अमेरिकेत या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या रोखण्यात आल्या आहेत.
भारतातही ऑक्सफोर्ड रोखली लसीची चाचणी
अॅस्ट्रॅजेनेका(AstraZeneca) आणि ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी लस(Oxford covid-19 Vaccine)च्या मानवी चाचणीत सामील असलेली व्यक्ती आजारी पडल्यानंतर त्याचा प्रयोग थांबवण्यात आला होता. या कोरोना लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणी 17 ठिकाणी सुरू आहे. पण डीसीजीआयनं नोटिस दिल्यानंतर सीरम इन्स्टिट्यूटनं चाचणी रोखण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या दुसऱ्या टप्प्यातील चाचण्याबाबत तज्ज्ञांमध्येही सकारात्मक वातावरण आहे. तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल अमेरिकास ब्राजिल, दक्षिण अमेरिका आणि भारतात होणार आहे. ही लस सर्वात अॅडव्हान्स असल्याचा दावा केला जात होता. सर्वांनाच या लशीची प्रतीक्षा होती. आता ही लस उपलब्ध होण्यासाठी आणखी बराच कालावधी लागू शकतो असंही सांगितलं जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
"शिवसैनिकांनीच मारहाण केली, राष्ट्रपती राजवट लागू करा", 'त्या' अधिकाऱ्याच्या मुलीची मागणी
"उद्धव ठाकरेंनी अयोध्येला येऊ नये नाहीतर..."; कंगनाच्या समर्थनार्थ मुख्यमंत्र्यांना धमकी
"महाविकास आघाडी सरकार व न्यायालयावर पूर्ण विश्वास", मराठा आरक्षणावर रोहित पवार म्हणतात...
अरे व्वा! WhatsApp चॅटिंगची गंमत वाढणार, एकाच बटणाने व्हॉईस, व्हिडीओ कॉलिंग करता येणार
"अरविंद केजरीवाल जिवंत आहेत तोपर्यंत असं होणार नाही", आपचा भाजपावर हल्लाबोल