पाटणा - जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत चिंताजनक पातळीवर वाढ होत आहे. सोमवारी एक लाखांचा टप्पा ओलांडणाऱ्या देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मंगळवारी तब्बल पाच हजार 611 नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 1 लाख 6 हजार 750 वर पोहोचली आहे. तसेच देशात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या 3303 वर पोहोचली आहे. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. मात्र लॉकडाऊनमुळे अनेकांनी काहीच काम नसल्याने आपल्या गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यांचं आपल्या गावी जाणं हे धोकादायक ठरत आहे. बिहारमध्ये याचा वाईट परिणाम आता दिसून येत आहे. गेल्या 4 दिवसांमध्ये बिहारमध्ये तब्बल 400 जण हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. इतर राज्यांमधून विशेष ट्रेनद्वारे आलेल्या 8337 स्थलांतरीत मजुरांचे नमुने घेण्यात आले. यापैकी 651जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाचे मुख्य सचिव संजय कुमार यांनी दिली. मात्र या आकडेवारीनुसार बिहारमध्ये येणारी प्रत्येक चौथी व्यक्ती ही कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत असल्याची माहिती समोर आली आहे.
बिहारमध्ये दिल्लीतून आलेल्या 1362 नागरिकांचे नमुने घेण्यात आले. यापैकी 835 नमुन्यांची तपासणी झाली. यामध्ये 218 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. जी 26 टक्के इतकी आहे. अशीच स्थिती पश्चिम बंगालमधून येणाऱ्या मजुरांबाबत देखील आहे. बंगालमधून येणारे 12 टक्के मजूर कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत तर महाराष्ट्रातून येणारे 11 टक्के मजूर पॉझिटिव्ह आढळत आहेत. हरियाणातून येणारे 9 टक्के मजूर करोना पॉझिटिव्ह आढळून येत आहेत.
बिहारमध्ये मजूर आपल्या गावी मोठ्या संख्येने परतत आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या 8 दिवसांसाठी योजना बनवण्यात आली आहे. यानुसार 26 मेपर्यंत 505 विशेष ट्रेन बिहारमध्ये दाखल होणार आहेत. विविध राज्यांमधून हे मजूर येणार आहेत. यासाठी बिहारचे प्रशासन राज्यांशी संपर्क साधत आहेत. तसेच बिहारमध्ये उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा, पंजाब, गुजरात या राज्यांतून येत आहेत. यासोबतच दक्षिणेतील राज्यांतूनही मजूर येत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
बाप रे बाप! 8 दिवसांत घरातून निघाली सापाची तब्बल 123 पिल्ले; लोकांचा उडाला थरकाप
कौतुकास्पद! डॉ. हर्षवर्धन यांचा देशाला अभिमान; जागतिक आरोग्य संघटनेत मिळालं मानाचं स्थान
CoronaVirus News : सरकारच्या 'या' योजनेचा 1 कोटी गरिबांना मिळाला आधार; मोदी म्हणाले...
CoronaVirus News : काय सांगता? संगीत ऐकून कोरोनाग्रस्त बरे होणार; 'ही' थेरेपी फायदेशीर ठरणार
CoronaVirus News : बापरे! मास्क न लावल्यास अटक होणार; 'या' देशाने घेतला मोठा निर्णय
CoronaVirus News : धक्कादायक! लॉकडाऊननंतर चिमुकल्यांची होईल भयानक अवस्था?; नोबेल विजेते म्हणतात...