हैदराबाद - जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही दोन लाखांवर पोहोचली आहे. तर पाच हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. मात्र लॉकडाऊनमुळे अनेकांनी काहीच काम नसल्याने त्यांनी आपल्या गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे. अनेकांनी पायी जाण्याचा पर्याय निवडला अन् आपलं गाव गाठलं. विविध मार्गाचा वापर करून लोक आपल्या गावी जात आहेत. मात्र या कामगारांना परत कामावर बोलावणं हे व्यावसायिकांसाठी आव्हान आहे.
मजुरांना कामावर परत बोलावण्यासाठी एका बिल्डरने अनोखी शक्कल लढवली आहे. हैदराबादच्या एका कन्स्ट्रक्शन साईटवर काम करणाऱ्या मजुरांना परत कामावर बोलावण्यासाठी त्यांच्या मालकाने थेट विमानाची तिकिटे बुक केली आहेत. तिकिटे मजुरांना पाठवण्यात आली आहेत. बिल्डरने उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडमध्ये राहणाऱ्या मजुरांना परत कामावर हजर होण्यासाठी ही सोय केली आहे. बिल्डरने मजुरांना विमान प्रवासाची आशा दाखवत परत बोलावलं आहे. प्रत्येक तिकिटासाठी त्याने 4000-50000 रुपये खर्च केले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : सर्वसामान्यांसाठी खूशखबर! 'या' जीवनावश्यक वस्तू झाल्या स्वस्त
CoronaVirus News : कोरोनाच्या संकटात अमेरिका मैत्री निभावणार; भारताला 'ही' मदत करणार
CoronaVirus News : ...म्हणून चेन खेचून मजुरांनी काढला ट्रेनमधून पळ; रेल्वे स्थानकावर झाला गोंधळ
CoronaVirus News : कोरोनामुळे बाप-लेकाची ताटातूट! नवजात बाळाला पाहण्यासाठी 'तो' व्याकूळ झाला पण...
'या' कंपनीचे तब्बल 74 कर्मचारी करोडपती झाले; CEO चे पॅकेजही 39 टक्क्यांनी वाढले
CoronaVirus News : दिलासादायक! कोरोनाची लढाई लवकरच जिंकता येणार; 'हे' औषध प्रभावी ठरणार