नवी दिल्ली - जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही तब्बल 33 लाखांच्यावर गेली असून लाखो लोकांना आपला जीव गमावावा लागला आहे. कोरोनाने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील देशभरात 3 मे पर्यंत लॉकडाऊन घोषित केला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडाही वेगाने वाढत असून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी देश सज्ज झाला आहे.
देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढून हा आकडा आता तब्बल 35 हजारांवर गेला असल्याची माहिती मिळत आहे. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 35 हजार 043 वर पोहचली आहे. तर आतापर्यंत 1100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी (1 मे) दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत देशभरात 1993 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. तर 553 जण बरे झाले आहेत. कोरोनाचा रिकव्हरी रेट म्हणजेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 25.37 वर आहे. तसेच देशातील जिल्ह्यांना रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये विभागण्यात आलं आहे अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे.
एम्पावर्ड ग्रुप-3चे अध्यक्ष पी डी वाघेला यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात 75 हजार व्हेंटिलेटर्सची आवश्यकता आहे. सध्या 19,398 व्हेंटिलेटर्स उपलब्ध आहेत. 60,884 व्हेंटिलेटर्स मागवण्यात आले आहेत. तसंच देशात 2.01 करोड पीपीई किटसची आवश्यकता आहे. आम्ही 2.22 लाख किटसची आणि 2.49 कोटी एन-95 मास्कची ऑर्डर दिलेली आहे. यातील 1.42 कोटी किट देशातच तयार होतील. देशात रोज 1.87 पीपीई किट देशातच तयार होत आहेत. 'हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन' टॅबलेट तयार करण्याचंही प्रमाण वाढवण्यात आलं आहे. 12.23 कोटींहून आता हे प्रमाण 30 कोटींवर नेण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
लवकर उरकून घ्या आर्थिक व्यवहार, मे महिन्यात 12 दिवस बँक बंद राहणार
CoronaVirus News : धक्कादायक! कोरोना चाचणी करण्यास सांगितले, संतापलेल्या पतीने पत्नीचे केस कापले
CoronaVirus News : जगाला कोरोनाचा विळखा! जाणून घ्या, कोणत्या देशात किती कोरोनाग्रस्त?
Zoom अॅपचा वापर करता?, मग असा ठेवा आपला डेटा सुरक्षित