नवी दिल्ली - जगभरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णांची संख्या ही 32 लाखांहून अधिक झाली आहे. भारतातही कोरोनाबाधितांचा आकडा 33 हजारांच्या वर पोहोचला आहे. तर 1000 हून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोना व्हायरसवर अद्याप कोणतंही औषध उपलब्ध झालेलं नाही. कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी हायड्रोक्सीक्लोरोक्वीन (एचसीक्यू) या गोळ्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात.कोरोनाविरोधातील लढाईत भारत जगातील अनेक देशांसाठी देवदूत ठरला आहे.
कोरोनावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवण्यात इतर देशांच्या तुलनेत भारत यशस्वी झाला आहे. याच दरम्यान एक दिलासादायक गोष्ट समोर आली आहे. कोरोना व्हायरसवर औषध शोधून काढण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. याच दरम्यान देशातही चंदीगडमध्ये 'सेप्सिवॅक' औषधावर संशोधन सुरू झालं आहे. हे संशोधन यशस्वी झालं तर येत्या 3 महिन्यांत कोरोनावर लस उपलब्ध होऊ शकेल अशी माहिती मिळत आहे. चंदीगडमधील पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टीट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च (PGIMER) मध्ये हे संशोधन सुरू आहे.
संशोधनाचे समन्वयक डॉ. राम विश्वकर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, PGIMER मध्ये 'सेप्सिवॅक' हे कोविड 19 वर औषध म्हणून वापरता येईल का? यावर संशोधन सुरू आहे. याची क्लिनिकल ट्रायलही सुरू झाली आहे. कोणतीही लक्षणे न दिसणाऱ्या कोरोनाग्रस्तांवर याचा वेगळा प्रयोगही करण्यात येणार आहे. त्यांना 'सेप्सिवॅक' लस म्हणून देण्यात येणार आहे. या ट्रायलमध्ये 'सेप्सिवॅक' यशस्वी ठरलं तर अनेकांचे जीव वाचू शकतील, अशी आशाही डॉ. विश्वकर्मा यांनी व्यक्त केली आहे.
WHO ने दिलेल्या माहितीनुसार, एखाद्या रुग्णाच्या शरीरात कोरोना व्हायरस एका महिन्यापर्यंत टिकून राहू शकतो. त्यामुळे याची ट्रायल ही कोरोनातून पूर्णत: बरे झालेल्या रुग्णांमध्ये किंवा क्वारंटाईनमधून बाहेर निघालेल्या रुग्णांवर करण्यात येणार आहे. त्यांना लस म्हणून हे औषध दिलं जाईल. ही ट्रायल यशस्वी ठरली तर येत्या तीन महिन्यांत कोरोनावरील उपचारांसाठी हे औषध उपलब्ध होऊ शकेल अशी माहिती मिळत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : कोरोनाचा धसका! मृतदेहाला खांदा देण्यासाठी कोणीच नाही तयार
CoronaVirus News : चिंताजनक! गेल्या 24 तासांत देशात 1823 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या 33610 वर
CoronaVirus News : लॉकडाऊनमध्ये जोडप्याने लढवली शक्कल, बाहुलीला बनवलं आजारी बाळ अन्
CoronaVirus News : धक्कादायक! पत्नीला कोरोना झाल्यामुळे पतीची आत्महत्या
CoronaVirus News : लॉकडाऊननंतर बदलणार मेट्रोचा प्रवास, 'ही' सेवा होऊ शकते बंद
CoronaVirus News : "...तर कोरोनाऐवजी लॉकडाऊनमुळे जास्त लोकांचा मृत्यू होईल"