चेन्नई - गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली असून आता चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशातील रुग्णसंख्येने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 8,380 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 193 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे आता भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 1,82,143 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 5164 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाय केले जात आहेत. मास्क लावणे, सोशल डिस्टंसिंग याद्वारे काळजी घेतली जात आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी रेल्वे, मेट्रो सेवा बंद आहेत. मात्र काही काळाने त्यादेखील सुरू करण्यात येणार आहेत. यामुळे मेट्रो प्रशासनानेही तयारी सुरू केली आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी एक अनोखा प्रयत्न केला आहे. लिफ्टचा वापर करताना आपण हाताचा प्रामुख्याने वापर करतो. मात्र हातांमार्फत कोरोनाचा धोका वाढू शकतो. त्यामुळे चेन्नई मेट्रोने पायाने चालणारी लिफ्ट तयार केली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी ही भन्नाट शक्कल लढवण्यात आली आहे.
चेन्नई मेट्रो रेल लिमिटेड (CMRL) हे अशा पद्धतीची लिफ्ट बनवणारं पहिलं शहर आहे. सामान्यत: लिफ्टचा वापर करताना एखाद्या मजल्यावर जायचं असल्यास ते बटण हाताने दाबलं जातं. मात्र या हटके पद्धतीने पायाने दाबण्याची सोय ही प्रवाशांना देण्यात आली आहे. यातून कोरानाचा प्रसार रोखण्यास काही प्रमाणात मदत होणार आहे. सध्या तरी अशी लिफ्ट चेन्नई मेट्रो रेल लिमिटेडच्या अॅडमिनिस्ट्रेशन बिल्डिंगमध्ये (CMRL) आहे. काही दिवसांतच सर्व स्टेशनवर अशी लिफ्ट असेल. पुन्हा सेवा सुरू करण्यासाठी चेन्नई मेट्रो मोठ्या स्तरावर तयारी करत आहे.
तमिळनाडून कोरोना रुग्णांची संख्या 20 हजारांच्या वर गेली आहे. गेल्या 24 तासांत 874 नवे रुग्ण आढळून आले आहेत. एकूण रुग्णांची संख्या आता 20246 वर पोहोचली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. रविवारी (31 मे) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 8,380 नवीन कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या एक लाख 80 हजारांवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा पाच हजारांवर पोहोचला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : धोका वाढला! कोरोनाच्या आकडेवारीने मोडला रेकॉर्ड, गाठला नवा उच्चांक
CoronaVirus News : 'हायड्रोक्सीक्लोरोक्वीनच्या वापरात मोठी तफावत'; ICMR ने WHO ला लिहिलं पत्र
CoronaVirus News : कुटुंबातील 'या' कोरोना योद्ध्याचा रोहित पवारांनी केला खास सन्मान
CoronaVirus News : बिहारच्या ज्योतीकुमारीचा गरीब बाप; चटका लावून जाणारी कहाणी
धक्कादायक! 'त्या' अपघातग्रस्त विमानाच्या ढिगाऱ्यात सापडले तब्बल 3 कोटी रुपये; परिसरात खळबळ
चार्जिंगचं नो टेन्शन! आता उन्हात चार्ज होणार फोन; 'या' कंपनीने आणली दमदार पॉवर बँक