CoronaVirus News : 'सोनिया गांधींनी तुमच्या तिकिटाचे पैसे दिलेत'; काँग्रेस आमदाराने वाटली पत्रकं

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 02:40 PM2020-05-11T14:40:17+5:302020-05-11T14:47:44+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना त्यांच्या मूळ राज्यात नेण्यासाठी रेल्वे भाडं आकारणार आहे. तोच मुद्दा आता सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यातील संघर्षाचे नवे कारण बनला होता.

CoronaVirus Marathi News congress amarinder raja came station to labours SSS | CoronaVirus News : 'सोनिया गांधींनी तुमच्या तिकिटाचे पैसे दिलेत'; काँग्रेस आमदाराने वाटली पत्रकं

CoronaVirus News : 'सोनिया गांधींनी तुमच्या तिकिटाचे पैसे दिलेत'; काँग्रेस आमदाराने वाटली पत्रकं

Next

नवी दिल्ली - कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेत देशभरात लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे. लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना त्यांच्या मूळ राज्यात नेण्यासाठी रेल्वे भाडं आकारणार आहे. तोच मुद्दा आता सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यातील संघर्षाचे नवे कारण बनला होता. अशा परिस्थितीत काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मजूर आणि कामगारांना घरी पाठवण्यासाठी येणारा रेल्वे प्रवासाचा खर्च काँग्रेस उचलणार असल्याचे जाहीर केले. 

पंजाबमधून रविवारी (10 मे) स्थलांतरित मजुरांना घेऊन एक विशेष ट्रेन रवाना झाली. त्यावेळी रेल्वे प्रवाशांना काँग्रस आमदाराकडून 'सोनिया गांधींनी तुमच्या तिकिटाचे पैसे दिलेत' अशा आशयाची पत्रकं वाटण्यात आल्याची घटना समोर आली आहे. काँग्रेसचे आमदार अमरिंदर राजा यांनी यांनी ट्रेनमधील प्रवाशांना पत्रकांचं वाटप केलं. त्यांच्यासोबत रेल्वे स्टेशनवर काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. भटिंडा स्थानकावरून ही ट्रेन मुझफ्फरपूरसाठी रवाना झाली.

रेल्वे स्थानकावरून ट्रेन रवाना होण्याआधी अमरिंदर राजा यांनी मजुरांना कोणी मदत केली आहे याची माहिती दिली तसेच  रेल्वे स्थानकावर भाषणही केलं. 'तुमच्या तिकिटाचे पैसे हे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिले आहेत. काँग्रेस पक्ष, मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आणि प्रदेशाध्यक्ष सुनील जाखर यांनी तुमच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. हे सर्व पत्रकात लिहिलं आहे. प्रवासात तुम्ही हे पत्रक आरामात वाचू शकता' असं अमरिंदर राजा यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात सुरू असलेल्या लॉकडाऊनदरम्यान भारतीय रेल्वेने 12 मेपासून पुन्हा प्रवासी रेल्वे गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सुरुवातीला 15 रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वेच्या केवळ 15 जोड्याच (30 फेऱ्या) धावणार असल्याची अशी माहिती रेल्वे विभागाने रविवारी एका निवेदनाद्वारे दिली. नवी दिल्ली स्थानकातून दिब्रुगढ, आगरतळा, हावडा, पाटणा, बिलासपूर, रांची, भुवनेश्वर, सिकंदराबाद, बंगळुरू, चेन्नई, थिरुवनंतपुरम, मडगाव, मुंबई सेंट्रल, अहमदाबाद, जम्मू तावीला जोडणाऱ्या या रेल्वे असतील. रेल्वे गाड्यांच्या तिकीट बुकिंगला सोमवारी (11 मे) सायंकाळी 4 वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. महत्वाचे म्हणजे, केवळ IRCTCच्या वेबसाईटवरूनच या गाड्यांचे तिकीट बुक करता येईल.

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! सोपा नसणार रेल्वेप्रवास, 'या' गोष्टी जाणून घ्या

CoronaVirus News : कोरोनाचा उद्रेक! गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ, चिंता वाढवणारी आकडेवारी

CoronaVirus News : लय भारी! 'या' भन्नाट उपकरणाच्या मदतीने फोन, नोटा करा सॅनिटाईज

CoronaVirus News : धक्कादायक! २४ तासांत राज्यभरात २२१ पोलिसांना कोरोनाची बाधा

 

Web Title: CoronaVirus Marathi News congress amarinder raja came station to labours SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.