CoronaVirus News : "गुजरातमध्ये नमस्ते ट्रम्प कार्यक्रमामुळेच कोरोना पसरला"

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2020 04:12 PM2020-05-08T16:12:01+5:302020-05-08T16:21:59+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: अहमदाबादमध्ये आयोजित करण्यात आलेल्या 'नमस्ते ट्रम्प' या कार्यक्रमामुळे गुजरातमध्ये कोरोना पसरला असा आरोप काँग्रेसने केला आहे.

CoronaVirus Marathi News congress blame bjp namaste trump prog spread covid19 SSS | CoronaVirus News : "गुजरातमध्ये नमस्ते ट्रम्प कार्यक्रमामुळेच कोरोना पसरला"

CoronaVirus News : "गुजरातमध्ये नमस्ते ट्रम्प कार्यक्रमामुळेच कोरोना पसरला"

Next

अहमदाबाद - कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी देश सज्ज झाला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा सातत्याने वाढत आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढून हा आकडा आता तब्बल 56 हजारांवर गेला आहे. 1800 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या सर्वाधिक असून यानंतर आता गुजरात दुसऱ्या क्रमांकावर असल्याची माहिती समोर आली आहे. गुजरातमध्ये वेगाने कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत राज्यात 396 लोकांचा मृत्यू झाला आहे. याच दरम्यान काँग्रेसने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. 

अहमदाबादमध्ये आयोजित करण्यात आलेल्या 'नमस्ते ट्रम्प' या कार्यक्रमामुळे गुजरातमध्ये कोरोना पसरला असा आरोप काँग्रेसने केला आहे. नमस्ते ट्रम्प हा कार्यक्रम आणि कोरोनाचा वाढता संसर्ग यावरून काँग्रेसने मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. यासोबतच याचा तपास केला जावा अशी मागणीही करण्यात आली आहे. गुजरात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित छावडा यांनी नमस्ते ट्रम्प कार्यक्रमामुळे गुजरातमध्ये कोरोना पसरल्याचा दावा  केला आहे. काही दिवसांपूर्वी अहमदाबादेतील मोटेरा स्टेडियममध्ये ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी मेलानिया यांच्या स्वागतासाठी आयोजित ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.

'जानेवारीमध्येच जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाचा प्रसार हा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे होत असल्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळे गर्दी होणारे कार्यक्रम टाळण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. मात्र, आरोग्य संघटनेच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून राजकीय लाभासाठी नमस्ते ट्रम्प कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. यामुळेच गुजरातमध्ये कोरोना पसरला' असं अमित छावडा यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

गुजरात सरकारने एक मोठा दावा केला आहे. कोरोना व्हायरसच्या संक्रमणापासून वाचण्यासाठी आयुर्वेदिक काढा उपयोगी पडत असल्याचा दावा सरकारने केला आहे. मात्र गुजरातच्या या दाव्यावर सोशल मीडियात अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. गुजरातच्या मुख्य सचिव जयंती रवि यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. गुजरातमध्ये राज्यात 3585 लोकांना आयुर्वेदिक काढा देण्यात आला. तर 2625 लोकांना होमिओपॅथी औषधे देण्यात आली. यातील फक्त 11 लोकांनाच कोरोना झाल्याचं समोर आलं. त्यांना कोरोना झाला कारण त्यांनी डोस पूर्ण केला नाही अशी माहिती जयंती रवि यांनी दिली आहे. क्वारंटाईन झालेल्या लोकांची प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी हा उपाय असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : कोरोनाची लढाई जिंकले, 13 लाख लोक बरे होऊन घरी परतले

CoronaVirus News : कोरोनाला रोखणारा आयुर्वेदिक काढा, 6000 लोकांवर चाचणी केल्याचा गुजरात सरकारचा दावा

CoronaVirus News : दारूमुळे सोशल डिस्टंसिंगचा फज्जा, 'या' सरकारने सुरू केली 'ऑनलाईन टोकन' व्यवस्था

CoronaVirus News : धक्कादायक! डोळ्यांमधूनही होतो कोरोनाचा संसर्ग; संशोधकांचा दावा

 

Web Title: CoronaVirus Marathi News congress blame bjp namaste trump prog spread covid19 SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.