CoronaVirus News: 20 लाख कोटी नव्हे, केवळ 3.22 लाख कोटी रुपयांचेच पॅकेज, काँग्रेसचा मोदी सरकारवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2020 08:20 PM2020-05-17T20:20:52+5:302020-05-17T20:24:28+5:30
'पंतप्रधानांच्या घोषणेवर आक्षेप घेत, मी अर्थमंत्र्यांना प्रश्न विचारतो आणि सरकारलाही चॅलेन्ज देतो, की त्यांनी मी देत असलेल्या आकड्यांचे खंडन करावे. मी अर्थमंत्र्यांसोबत चर्चेलाही तयार आहे. अर्थमंत्र्यांनी प्रश्नांची उत्तरे द्यायलाच हवीत,' असे शर्मा म्हणाले.
नवी दिल्ली : कोरोना महामारीतून देशाला सावरण्यासाठी केंद्र सरकारने 20 लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शनिवार या आर्थिक पॅकेजच्या पाचव्या आणि अखेरच्या टप्प्याची घोषणा केली. यानंतर काँग्रेसचे वरिष्ठ नेते आनंद शर्मा यांनी नाराजी व्यक्त करत, देशातील खराब आर्थिक परिस्थितीचा सामना करण्यासाठी सरकारकडे कुठल्याही प्रकारचा रोडमॅप नाही, असे म्हटले आहे.
आणखी वाचा - CoronaVirus News : आनंदाची बातमी! पुण्यातील फार्मा कंपनीचा दावा; कोरोनाच्या उपचारात रामबाण ठरतील 'तीन' औषधे
शर्मा म्हणाले, 'केंद्र सरकारने जारी केलेले हे आर्थिक पॅकेज खऱ्या अर्थाने लोन आहे. याला प्रोत्साहन पॅकेज म्हटले जाऊ शकत नाही. तसेच काँग्रेसने पुन्हा एकदा दावा केला, की केंद्राने जाहीर केलेल्या या पॅकेजमध्ये देशातील मजूर आणि शहरातील गरीब जनतेसाठी काहीही नाही. पंतप्रधान मोदींनी घोषित केलेल्या 20 लाख कोटी रुपायांच्या विशेष पॅकेजवर हल्ला करत आनंद शर्मा म्हणाले, हे पॅकेज केवळ 3.22 लाख कोटी रुपयांचे आहे. जे जीडीपीच्या केवळ 1.6 टक्के आहे.
आणखी वाचा -CoronaVirus News: WHOमध्ये भारताला मोठे पद; चीनवर निशाणा, भारतावर सर्वांच्या नजरा
अर्थमंत्र्यांना चॅलेन्ज -
'पंतप्रधानांच्या घोषणेवर आक्षेप घेत, मी अर्थमंत्र्यांना प्रश्न विचारतो आणि सरकारलाही चॅलेन्ज देतो, की त्यांनी मी देत असलेल्या आकड्यांचे खंडन करावे. मी अर्थमंत्र्यांसोबत चर्चेलाही तयार आहे. अर्थमंत्र्यांनी प्रश्नांची उत्तरे द्यायलाच हवीत,' असे शर्मा म्हणाले.
स्थलांतरित मजुरांवर उपस्थित केला प्रश्न -
सरकारच्या नियोजनातील आभावामुळे, रस्त्यावर पायी चालत असलेल्या स्थलांतरित मजुरांसंदर्भातही सरकारने देशाला उत्तर द्यायला हवे. एवढेच नाही, तर देशाला अर्थमंत्र्यांकडून गांभीर्याची अपेक्षा आहे, असेही शर्मा म्हणाले.
आणखी वाचा - CoronaVirus News : एका तासात 250 जणांची कोरोना तपासणी, टेस्टिंग किटपेक्षाही वेगवान श्वान!
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी साधला होता काँग्रेसवर निशाणा -
यापूर्वी, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग पाचव्या दिवशी पत्रकारांशी संवाद साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या २० लाख कोटींच्या पॅकेजची माहिती दिली. यावेळी काँग्रेसला लक्ष्य करत त्यांनी, स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नावर एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. त्यामुळे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींनी यावरून राजकारण करू नये, अशी मी हात जोडून विनंती करते, असे म्हटले होते.