नवी दिल्ली - कोरोनामुळे देशातील परिस्थिती गंभीर झाली आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली असून धडकी भरवणारी आकडेवारी समोर आली आहे. रुग्णसंख्येने पुन्हा एकदा रेकॉर्ड मोडला आहे. देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. कोरोना व्हायरसवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. केंद्राकडे कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी कोणतीही योजना नाही असा आरोप राहुल गांधींनी केला आहे.
"कोरोना व्हायरस देशाच्या नव्या भागांत अत्यंत वेगाने पसरत आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी, त्याविरोधात लढण्यासाठी मोदी सरकारकडे कोणतीही योजना नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी शांत बसले आहेत. त्यांनी या रोगापुढे आणि त्याच्या वाढत्या प्रादुर्भावापुढे सरेंडर केलं आहे" असाही आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी कोरोना व्हायरस, भारत-चीन संघर्ष यावरून जोरदार हल्लाबोल करत आहेत. याआधीही इंधन दरवाढीचा भडका आणि कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने होत असलेली वाढ यावरून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता. "मोदी सरकारने कोरोना महामारी व पेट्रोल-डिझेलच्या किमती अनलॉक केल्या आहेत" अशी टीका राहुल गांधी यांनी केली होती. तसेच या सोबत एक ग्राफही शेअर केला आहे. यामध्ये कशी वाढ झाली हे दाखवण्यात आले होते.
देशामध्ये कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे नवे 18,552 रुग्ण सापडल्याने देशभरातील आकडेवारीने तब्बल 5 लाखांचा टप्पा पार केला आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत विक्रमी वाढ पाहायला मिळालेली असताना 384 मृत्यूही नोंदविले गेले आहेत. देशात सध्या 1,97,387 रुग्ण उपचार घेत आहेत एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 5,08,953 वर गेला आहे. तर 295881 रुग्ण बरे झाले आहेत. देशात एकूण मृतांचा आकडा 15,685 झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : आनंदाची बातमी! देशाचा रिकव्हरी रेट 58%, जवळपास 3 लाख लोकांनी केली कोरोनावर मात
Google Pay चा वापर करणं धोकादायक, खरंच RBI ने घातली बंदी?; जाणून घ्या नेमकं काय आहे 'हे' प्रकरण
CoronaVirus News : राज ठाकरेंच्या 'कृष्णकुंज'मध्ये कोरोनाचा शिरकाव; घरकाम करणाऱ्या दोघांना लागण
Coronil : कोरोनिल वादाच्या भोवऱ्यात; बाबा रामदेव यांच्यासह 5 जणांविरोधात FIR दाखल
CoronaVirus News : आजारी आहात?, चिंता विसरा आता घरबसल्या मोफत चेकअप करा
घरबसल्या अपडेट करा रेशन कार्ड, नोंदवा कुटुंबातील सदस्याचं 'नाव'; जाणून घ्या कसं
CoronaVirus News : "कोरोनावर लस विकसित झाली तरी..."; बिल गेट्स यांचं चिंताजनक वक्तव्य