नवी दिल्ली - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 22 लाखांचा टप्पा पार केला आहे. तर हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. बिग बी अमिताभ बच्चन, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक नेत्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. याच दरम्यान मोदी सरकारमधील आणखी एका मंत्र्याचा रिपोर्ट हा कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. केंद्रीय मंत्री अर्जुन मेघवाल यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.
मेघवाल यांच्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून त्यांच्यावर सध्या दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याच दरम्यान काँग्रेसने अर्जुन मेघवाल यांना पापड पाठवले आहेत. 'पापड खाओ, कोरोना भगाओ' असा सल्ला काही दिवसांपूर्वी मेघवाल यांनी दिला होता. त्यामुळे आता काँग्रेसने ते पॉझिटिव्ह आल्यावर त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
मध्य प्रदेशच्या मंदसौर जिल्ह्यातील काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी मेघवाल यांनी पोस्टाने पापड पाठवले आहेत. 'मेघवाल यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे हे पापड त्यांनी खाल्ले पाहिजेत. त्यानंतर याचा रिसर्च करणं गरजेचं आहे. जेणेकरून याने कोरोना ठिक होतो की नाही याबाबत माहिती मिळेल' असं काँग्रेसच्या अनिल शर्मा यांनी म्हटलं आहे. तसेच 'मुक्के से ना झापड़ से...कोरोना भागेगा पापड़ से' असं देखील म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
अर्जुन मेघवाल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून कोरोनाची माहिती दिली होती. 'माझी चाचणी पॉझिटिव्ह आली असून उपचारासाठी रुग्णालयात दाखल झालो आहे. जे लोक गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आले आहेत त्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्या असं त्यांनी' म्हटलं होतं. काही दिवसांपूर्वी ते आपल्या अजब विधानामुळे चर्चेत आले आणि एका पापडामुळे वादात अडकले होते. पापड खाल्ल्याने कोरोना व्हायरस ठीक होईल, असा दावा त्यांनी व्हिडीओतून केला. मेघवाल यांच्या हस्ते एका प्रायव्हेट कंपनीचा पापड लॉन्च करण्यात आला होता. यानंतर आता काँग्रेसने त्यांना पापड पाठवले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
लय भारी! बोटीतून निघाला नवरदेव अन् पाहुणे मंडळी पाण्यात, पुरात निघाली हटके वरात
कोरोना बैठकीत योगींसमोरच मुख्य सचिव खेळत होते गेम, आपने ट्विट केला 'तो' फोटो
बापरे! बटाट्याच्या भाजीला विरोध केला म्हणून संतापलेल्या पत्नीने पतीला धोपाटण्याने चोपले
यूपीत टवाळखोरांचा उच्छाद! अमेरिकेत स्कॉलरशिप मिळवण्याऱ्या 'तिला' छेडछाडीत गमवावा लागला जीव
CoronaVirus News : दिलासादायक! कोरोनाच्या संकटात आशेचा किरण, WHO ने दिली महत्त्वाची माहिती
तैवानच्या हद्दीत घुसले, मिसाईल डागलेली पाहून चिनी वैमानिक पळाले
शिकागोमध्ये हजारो लोकांनी केली लूटमार; 100 जणांना अटक, 13 अधिकारी जखमी