नवी दिल्ली - देशात धोका वाढला असून कोरोनाच्या आकडेवारीने आतापर्यंतचा 24 तासांतील नव्या रुग्णांच्या संख्येचा रेकॉर्ड मोडला आहे. रुग्णांची संख्या ही तब्बल 2 लाख 97 हजारांवर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली असून आता चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशातील रुग्णसंख्येने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 10,956 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 396 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान काही धक्कादायक घटना समोर येत आहेत.
देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा सातत्याने वाढत आहे. काही ठिकाणी जेलमधील कैद्यांना देखील कोरोनाची लागण झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एका कोरोनाग्रस्त आरोपीने पीपीई किट घालून रुग्णालयातून पळ काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा संपूर्ण प्रकार रुग्णालयातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका कोरोनाग्रस्त कैद्याला हरियाणातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी वैद्यकीय कर्मचारी जे पीपीई किट परिधान करतात. ते घालून आरोपीने रुग्णालयातून पळ काढला.
पीपीई घालून आरोपी कोरोना वॉर्डच्या बाहेर पडला. पीपीई कीट असल्याने हा रुग्णालयातील कर्मचारी असल्याचे अनेकांना वाटले. त्यामुळेच त्याला कोणीही बाहेर जाताना अडवले नाही. याचाच फायदा घेत तो रुग्णालयामधून पसार झाला. या घटनेनंतर रुग्णालयात एकच खळबळ उडाली. पोलीस उप अधीक्षक धरमबीर सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'आरोपीला कोरोनाची लागण झाल्यामुळे न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला. त्यानंतर त्याला रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र या कोरोनाग्रस्त आरोपीने पीपीई किट घालून रुग्णालयामधून पळ काढला.' एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
शुक्रवारी (12 जून) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 10,956 नवीन कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दोन लाख 97 हजारांवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा आठ हजारांवर पोहोचला आहे. भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण 30 जानेवारीला आढळून आला होता. त्यानंतर शंभर दिवसांनी देशातील कोरोना रुग्णांची संख्या एक लाखावर गेली. त्यापुढील पंधरवड्यात आणखी एक लाख रुग्ण वाढले.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्र्यांनी केला मोठा खुलासा, म्हणाले...
CoronaVirus News : अमेरिकेत भारतीय वंशाच्या डॉक्टरची कमाल; कोरोना रुग्णावर केली यशस्वी शस्त्रक्रिया
CoronaVirus News : मृत्यूनंतरही होताहेत हाल! 14 मृतदेहांचा 'तो' धक्कादायक Video व्हायरल
"आता आपल्याकडे मौनेंद्र मोदी आहेत ते..."; भारत-चीन सीमावादावरून पंतप्रधानांवर निशाणा
CoronaVirus News : बापरे! तब्बल 35 निगेटिव्ह लोकांना दिला कोरोनाचा 'पॉझिटिव्ह' रिपोर्ट अन्...