हाजीपूर - कोरोना व्हायरसच्या जगव्यापी साथीने प्रगत देशांना हतबल केले आहे. सर्वतोपरी प्रयत्न करूनही आव्हाने वाढत आहेत. एक-दुसऱ्यापासून दूर राहणे, घराबाहेर न पडणे, घरातच राहणे, हा एकमेव मार्ग आहे. यात जराही निष्काळजीपणा केल्यास भारताला जबर किंमत मोजावी लागेल. त्याचा अंदाज बांधणेही कठीण आहे, असं कळकळीने सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात ‘लॉकडाऊन’ लागू करण्यात येत असल्याची घोषणा केली. मोदींनी लोकांना जेथे आहात तेथेच राहण्याचे आवाहन केले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व खबरदारीचे उपाय केले जात आहेत. अशातच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
देशातील विविध रुग्णालयात कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेच्यादृष्टीन विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. मात्र याच दरम्यान प्रशासनाचा एक निष्काळजीपणा समोर आला आहे. आयसोलेशन वॉर्डमधून एका कोरोना रुग्णाने पळ काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पंजाबच्या हाजीपूरमधील लालगंजमध्ये हा भयंकर प्रकार घडला आहे. क्वारंटाईन सेंटर एबीएस कॉलेजमध्ये राहणाऱ्या प्रवासी मजुराचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला होता.
लालगंज परिसरात एकूण 9 मजुरांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी आठ मजूर हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं. त्यामुळे त्यांना सुरक्षेच्या दृष्टीने हाजीपुरातील आयसोलेशन वॉर्डमध्ये पाठविण्याचे सांगण्यात आले. मात्र त्यापैकी एक प्रवासी मजूर आयसोलेशन वॉर्डातून पळाला. इतकंच नाही तर तो पळाल्यानंतर आपल्या घरी गेला. त्यानंतर बँकेतून पैसे काढण्यासाठी गेला आणि केस कापण्यासाठी सलूनमध्येही गेला. पुढे 2 दिवस तो गावभर फिरत होता. धक्कादायक बाब म्हणजे प्रशासनाला याबाबत काहीच माहिती नव्हती.
मजुरांच्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट आल्यावर प्रशासनाला जाग आली आणि आयसोलेशन वॉर्डमध्ये एक मजूर नसल्याचं समजलं. आयोसेलेशन वॉर्डमधून बेपत्ता झालेल्या मजुराला शोधण्यासाठी धावाधाव सुरू झाली. विशेष म्हणजे आयसोलेशन वॉर्डमधून एक मजूर बेपत्ता झाला होता व प्रशासनाला याबाबत माहितीच नव्हती. मजुराच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेण्यात आला असून त्यांची देखील कोरोना चाचणी करण्यात आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : बापरे! 6 फुटापर्यंतच्या सोशल डिस्टन्सिंगमध्येही कोरोनाचा धोका; इतकं ठेवा अंतर
CoronaVirus News : भयंकर! आधी जिवंत व्यक्तीला केलं मृत घोषित, कुटुंबाला सोपवला भलताच मृतदेह पण...
Video - 'अम्फान'नंतर दोन गटांमध्ये जोरदार राडा, तुफान हाणामारी; पोलीस आले अन्...
CoronaVirus News : 'रेल्वेच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार करण्याचा प्रयत्न', 'या' सरकारचा गंभीर आरोप
CoronaVirus News : दिलासादायक! देश कोरोनाची लढाई जिंकणार, 'हा' नवा फॉर्म्युला फायदेशीर ठरणार?
CoronaVirus News : शाळा-कॉलेज कधी सुरू होणार?; केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलं उत्तर