CoronaVirus News : ...म्हणून कोरोना पॉझिटिव्ह महिलेने बाळाचं नाव ठेवलं 'सॅनिटायझर'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2020 11:33 AM2020-06-07T11:33:40+5:302020-06-07T11:37:46+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या दोन लाखांवर पोहोचली असून हा आकडा सातत्याने वाढत आहे.
नवी दिल्ली - भारतात कोरोनाला आळा घालण्यासाठी व्यापक प्रयत्न करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊनची घोषणा केली. तसेच लोकांना घरातून बाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या दोन लाखांवर पोहोचली असून हा आकडा सातत्याने वाढत आहे. आत्तापर्यंत देशात कोरोनामुळे 6 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. याच दरम्यान कोरोना पॉझिटिव्ह महिलेने बाळाला जन्म दिला असून आपल्या मुलीचं नाव 'सॅनिटायझर' असं ठेवलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशमध्ये ही घटना घडली आहे. भारती असं महिलेचं नाव असून त्या कोरोना पॉझिटिव्ह आहेत. भारती यांच्या कुटुंबातील सर्वच सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यात घरातील वृद्ध सदस्याचा मृत्यूही झाला. कुटुंबातील सगळेच सदस्य क्वारंटाईन असतानाच त्यांना नववा महिना लागला होता. याच दरम्यान त्यांनी एका मुलीला जन्म दिला. आपल्या बाळाचं नाव त्यांनी सॅनिटायझर असं ठेवलं आहे.
CoronaVirus News : आनंदाची बातमी! कोरोना हरणार, देश जिंकणारhttps://t.co/l5wzgrCINg#CoronaUpdatesInIndia#CoronavirusIndia#CoronaUpdates#COVID19India
— Lokmat (@MiLOKMAT) June 7, 2020
देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या संकटात चिमुकलीचा जन्म झाला असल्याने भारती यांनी आपल्या बाळाचं नाव सॅनिटायझर ठेवण्याचा निर्णय घेतला. हे नाव ठेवायला सुरुवातीला त्यांच्या पतीचा विरोध होता. मात्र नंतर हे यासाठी तयार झाले. बाळ आणि आईची प्रकृती आता उत्तम असल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. एका हिंदी वेबसाईटन याबाबतचे वृत्त दिले आहे. याआधीही काही दाम्पत्यांनी आपल्या मुलाचे नाव हे लॉकडाऊन ठेवल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
CoronaVirus News : कोरोनाच्या आकडेवारीने गाठला नवा उच्चांकhttps://t.co/fra8mL2HvT#CoronaUpdatesInIndia#CoronavirusIndia#CoronaUpdates#COVID19India
— Lokmat (@MiLOKMAT) June 7, 2020
CoronaVirus News : अनोखा आदर्श! 'या' मुलीचं कराल भरभरून कौतुकhttps://t.co/8dPdAQTVUu#CoronaUpdatesInIndia#CoronavirusIndia#CoronaUpdates#COVID19India#education
— Lokmat (@MiLOKMAT) June 7, 2020
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : शिक्षणासाठी काय पण! 'या' मुलीच्या जिद्दीला तुम्हीही कराल सलाम
CoronaVirus News : मंदिरात सॅनिटायझरच्या वापराला पुजाऱ्यांचा विरोध; 'हे' आहे कारण
CoronaVirus News : कोरोनाच्या लढ्यात WHO ने जारी केल्या मास्क संदर्भात नव्या गाईडलाईन्स
CoronaVirus News : टक्कल असलेल्या पुरुषांना कोरोनाचा सर्वाधिक धोका; वेळीच व्हा सावध