इंदूर :मध्य प्रदेशातील इंदूर येथे एका कोरोना संक्रमित महिलेने दोन जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. येथील एमटीएच रुग्णालयात संबंधित महिलेला कोरोनाची लागण झाल्याने दाखल करण्यात आले होते. याच रुग्णालयात महिलेने जुळ्यांना जन्म दिला. यासंदर्भात बोलताना, रुग्णालय प्रमुख डॉ. सुमित शुक्ला यांनी सांगितले, की आई आणि दोन्ही जुळे चिमुकले अगदी सुरक्षित आणि स्वस्थ आहेत.
यापूर्वी इंदूरमध्ये एका 95 वर्षीय महिलेने कोरोनावर मात केली होती. शहरातील एका खासगी रुग्णालयात 11 दिवस उपचार घेतल्यानंतर त्या 21 मेरोजी ठणठणीत होऊन घरी परतल्या. आता, या आजींचा समावेश, कोरोनावर मात केलेल्या देशातील सर्वात वयस्क व्यक्तींमध्ये झाला आहे.
GoodNews! देशातील 'या' जिल्ह्यांत रिकव्हरी रेटची 100 टक्क्यांकडे वाटचाल, कोरोनाला देतायत 'टफ फाईट'
CoronaVirus News: 'या' देशात मोठी Tragedy बनलाय कोरोना, मृतदेह दफनायलाही कमी पडतेय जागा
मध्य प्रदेशातील इंदूर शहर हे सध्या कोरोनाचा हॉटस्पॉट बनले आहे. राज्यातील सर्वाधिक कोरोनासंक्रमित इंदूरमध्येच आहेत. एका अधिकाऱ्याने शनिवारी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत येथे 83 नवे रुग्ण समोर आले आहेत. यामुळे आता येथील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 2,933वर पोहोचली आहे.
CoronaVirus News: चीनने केले कोरोना व्हायरसवरील व्हॅक्सीनचे परीक्षण; दिसून आला आशादायक 'रिझल्ट'