नवी दिल्ली : देशात कोरोना संक्रमणाचा वेग सातत्याने कमी होत आहे. आता संक्रमित रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचे प्रमाण 13.9 दिवसांवर गेले आहे. हीच स्थिती गेल्या तीन दिवसांपासून आहे, असे आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले. ते गुरुवारी राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (एनसीडीसी) येथे कोरोना तपासणीसाठी कोबास-6800 मशीनचे लोकार्पण करण्यासाठी आले होते.
डॉ. हर्षवर्धन म्हणाले, गेल्या 24 तासांत 14 राज्यांमध्ये आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळला नाही. यात गुजरात, तेलंगाणा, झारखंड, आंध्र प्रदेश, अंदमान आणि निकोबार द्वीप, गोवा, सिक्किम, चंदीगड, मेघालय आणि मिझोरम यांचा समावेश आहे.
रोज एक लाख लोकांची तपासणी करण्याची क्षमता -
हर्षवर्धन म्हणाले, गेल्या तीन दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा दर 13.9 दिवसांवर पोहोचला आहे. तर गेल्या 14 दिवसांत हा दर 11.1 दिवसांवर कायम आहे. कोरोना तपासाच्या क्षेत्रात मिळालेल्या यशाचा उल्लेख करत, ते म्हणाले, आता आपली क्षणता रोज एक लाख लोकांना तपासण्याची झाली आहे. सध्या देशात 500 हून अधिक लॅबमध्ये कोरोनाची तपासणी होत आहे. 359 सरकारी तर 145 खासगी प्रयोगशाळांमधून ही तपासणी केली जात आहे.
आणखी वाचा - CoronaVirus News : संशोधकांचा दावा; आणखी 2 वर्षे हाहाकार माजवणार कोरोना, 'या'मुळे होऊ शकणार नही खात्मा
कोरोनाची तपासणी करणारे कोबास-6800 हे एक अत्याधुनिक मशीन आहे. हे मशीन पीसीआर पॅटर्नवर नमुन्यांची रियल टाइम तपासणी करते. या एका मशीनने 24 तासांत 1200 नमुने तपासले जाऊ शकतात. हे मशीन रोबोटिक असल्याने तपासणीदरम्यान एखाद्या कर्मचाऱ्याला कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता फार कमी होते. तसेच हे मशीन केवळ बायोसेफ्टी लेवल 2च्या लॅबमध्येच ठेवले जाऊ शकते, अशी माहितीही हर्षवर्धन यांनी दिली.
आणखी वाचा - Video ट्विट करत राहुल गांधींचा सरकारवर हल्ला बोल, म्हणाले - देशाचा स्वाभिमानी ध्वज झुकू देणार नाही