नवी दिल्ली : भारतात कोरोनाबाधितांच्या संख्येत रोजच विक्रमी वाढ होताना दिसत आहे. देशात गेल्या 24 तासांत जवळपास 11 हजार नवे रुग्ण सापडले, तर जवळपास 400 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता 3 लाखच्या जवळ जाऊन पोहोचली आहे आणि याबरोबरच भारत जगातला चौथा सर्वात मोठा कोरोना व्हायरस प्रभावित देश बनला आहे.
जगात कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. यानंतर ब्राझीलल, रशिया आणि आता भारताचा नंबर आला आहे. भारताने शुक्रवारी युनायटेड किंगडम अर्थात इंग्लंडलाही मागे टाकले आहे.
CoronaVirus News: आश्चर्य! कोरोना व्हायरस अँटीबॉडीजसह बाळाचा जन्म, डॉक्टर हैराण; रुग्णालय म्हणते...
सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेले पाच देश -• अमेरिका - 20 लाख रुग्ण
• ब्राझील - 8 लाख रुग्ण
• रशिया - 5 लाख रुग्ण
• भारत - 2.97 लाख रुग्ण
• इंग्लंड - 2.92 लाख रुग्ण
Corona Vaccine Update: या भारतीय कंपनीमध्ये तयार होतेय कोरोनाची 'सर्वात अॅडव्हान्स्ड' व्हॅक्सीन
आरोग्य विभागाने जारी केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात एकूण 10,956 नवे कोरोनाबाधित समोर आले आहेत. तर एकूण 396 जणांचा मृत्यू झाला आहे.
• भारतात आतापर्यंत एकूण रुग्ण - 2,97,535
• एकूण अॅक्टिव्ह रुग्ण - 1,41,842
• आतापर्यंत बरे झालेले रुग्ण - 1,47,195
• आतापर्यंत झालेले मृत्यू - 8,498
दिलासादायक! कोरोना होतोय हद्दपार; 'या' 26 देशांमध्ये आता एकही रुग्ण नाही
गेल्या आठवड्यापासून भारतात रोज दहा हजारहून अधिक कोरोनाबाधित समोर येत आहेत. मात्र गेल्या 24 तासांत सर्व विक्रम तुटले आहेत. जगात ज्या देशांत आता रोज सर्वाधिक रुग्ण सापडत आहेत त्यात भारतही सामील झाला आहे आणि तीसऱ्या क्रमांकावर आहे. अमेरिकेत रोज 20 हजार, तर ब्राझीलमध्ये रोज जवळपास 15 हजार नवे रुग्ण आढळून येत आहेत. तर त्याच्या खालोखाल भारताचा नंबर आहे. येथे रोज 10 हजारहून अधिक रुग्ण सापडत आहेत.
दिलासादायक : जगातल्या 'या' पहिल्या शहरात 'हर्ड इम्यूनिटी'नं होतोय कोरोनाचा खात्मा! पण...
टेस्टिंगच्या बाबतीत आता भारताचाही वेग वाढताना दिसत आहे. आता भारतात जवळपास 54 लाख लोकांची कोरोना टेस्ट झाली आहे. सध्या एका दिवसाला जवळपास सरासरी दीड लाख टेस्ट होत आहेत. लवकरच हा वेग रोज 2 लाख टेस्टपर्यंत पोहोचेल. अमेरिका, रशिया आणि इंग्लंडनंतर टेस्टिंगच्या बाबतीत भारत चौथ्या नंबरवर आहे.
आता या 'स्वस्त' औषधाने होणार कोरोनाचा 'मस्त' इलाज? गोळीची किंमत फक्त 1 रुपया