विशाखापट्टणम - कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. भारतात सध्याची स्थिती पाहता 3 मेपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढून 33,000 च्या वर गेला आहे. तर आतापर्यंत 1000 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. पंतप्रधानांनी लोकांना घरी राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच सोशल डिस्टंसिंग पाळण्यास सांगितलं आहे. मात्र तरीही अनेक ठिकाणी गर्दीचे चित्र पाहायला मिळत आहे. लोक विनाकारण लॉकडाऊनमध्येही घराबाहेर पडत आहे. अशीच एक घटना समोर आली आहे.
लॉकडाऊनमध्ये एका जोडप्याने पोलिसांना चकवा देण्यासाठी शक्कल लढवली आहे. त्यांनी बाहुलीला आजारी बाळ बनवलं आणि बाईकने प्रवास केला. पण याच दरम्यान नेमके ते पोलिसांच्या तावडीत सापडले आणि पकडले गेले. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममध्ये ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बाईकवर असलेल्या एका जोडप्याला पोलिसांनी अडवलं. मेडिकल इमर्जन्सी असल्यामुळे बाळाला रुग्णालयात घेऊन जायचं असल्याचं सांगितलं. मात्र पोलिसांना थोडा संशय आला त्यांनी बाळाला पाहीलं असता प्रत्यक्षात बाळ नसून बाहूली असल्याचं समोर आलं.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : धक्कादायक! पत्नीला कोरोना झाल्यामुळे पतीची आत्महत्या
CoronaVirus News : लॉकडाऊननंतर बदलणार मेट्रोचा प्रवास, 'ही' सेवा होऊ शकते बंद
CoronaVirus News : "...तर कोरोनाऐवजी लॉकडाऊनमुळे जास्त लोकांचा मृत्यू होईल"
Rishi Kapoor passed away : "एक एव्हरग्रीन पर्सनॅलिटी, ते आपल्यात नाहीत यावर विश्वास ठेवणं कठीण"