नवी दिल्ली - भारतातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत असून आतापर्यंत 1300 हून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या ही 42,000 वर पोहोचली आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देशात 17 मेपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने लोकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. वैद्यकिय क्षेत्रातील कर्मचारी कोरोनाग्रस्तांसाठी अहोरात्र काम करत आहेत. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही दिवसागणिक वाढत आहे. वेगाने पसरणाऱ्या या कोरोना व्हायरसने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. काही ठिकाणी कोरोनाचा रिपोर्ट येण्यासाठी 7 ते 10 दिवसांचा कालावधी लागत आहे. यामुळे देखील कोरोनाचा संसर्ग वाढला असल्याची माहिती मिळत आहे. याच दरम्यान दिल्लीतील एका रुग्णालयातील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोरोनाचा रिपोर्ट येण्यासाठी 7 दिवस लागले पण तोपर्यंत तब्बल 55 कोरोना वॉरियर्सना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.
दिल्लीतील आंबेडकर रुग्णालयात काही दिवसांपूर्वी एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला. त्यांच्या संपर्कात आलेल्या 55 वैद्यकिय कर्मचाऱ्यांना आता कोरोनाची लागण झाली आहे. 19 एप्रिल रोजी या कोरोन रुग्णाची तपासणी करण्यात आली. त्याचे रिपोर्ट मात्र 26 एप्रिलला आले. या 7 दिवसांमध्ये या कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. या सर्वांच्या कोरोना चाचणीचे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : संतापजनक! मजूर दाम्पत्याला शौचालयात केलं क्वारंटाईन, फोटो व्हायरल
CoronaVirus News : शेतकऱ्यांसाठी खूशखबर! आता घरबसल्या शेतमालाची विक्री, सरकारने लाँच केलं अॅप
CoronaVirus News : ...म्हणून ब्रिटनच्या पंतप्रधानांनी डॉक्टरांच्या नावावरून ठेवलं आपल्या मुलाचं नाव
CoronaVirus News : दारुसाठी काय पण! तळीरामांना सोशल डिस्टंसिंगचाही विसर, पोलीस आले अन्...